Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर ला भेट देऊन घेतले श्री शनि महाराजांचे मनोभावे दर्शन!

शनिशिंगणापूर (प्रतिनिधी)
भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी शनिशिंगणापूरला‌ भेट देऊन येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला.
अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.


गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील हेलीपॅड वर आगमन झाले. तेथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचा स्वागत करत सत्कार केला. यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील , नामदार दादा भुसे,तसेच नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील, सौ धनश्री विखे पाटील, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.

kamlakar


महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शनिशिंगणापूर येथे आल्या .त्यांनी मंदिरात जाऊन श्री शनि महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले .तेल अभिषेक, आरती, पूजा केली. श्री शनि महाराजांच्या दर्शनानंतर त्या रवाना झाल्या. दरम्यान शनिशिंगणापूर तसेच झापवाडी येथील हेलिपॅड परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्यानिमित्त त्या जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून जड वाहतूक वळविण्यात आली होती.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button