Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
Blog

शिर्डीत लवकरच होणार नगरपरिषदेकडून  भव्य लेझर शो गार्डन! मुख्याधिकारी 

शिर्डी (प्रतिनिधी)
देशातील तिरुपती नंतर श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या पावन भूमी शिर्डी नगरीत शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने सुमारे पंचवीस एकर जागेवर भव्यदिव्य लेझर शो गार्डन तसेच १९१८ सालातील साईबाबांच्या जिवनक्रमाचा चलचित्र देखावा साकारण्यात येणार असल्याने आता साईभक्तांना
प्रत्यक्षात साईबाबांच्या सहवासात असल्याचा भास होणार असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी शिर्डीत शेतीमहामंडळाची जमीन मिळाली असल्याची माहिती शिर्डी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

दरम्यान जगभरात सबका मालीक एक हा मुलमंत्र देणा-या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून करोडो भाविक शिर्डीत येत असतात.आलेल्या भाविकांना याठिकाणी साईसमाधी दर्शनाखेरीज विरंगुळा करण्यासाठी करमणुकीचे एकही साधन नाही.देशातील सर्वात मोठी हॉटेल इंडस्ट्रीज आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरात आहे.याठिकाणी छोटेमोठे जवळपास सातशे ते आठशे हॉटेल आणी लॉज आहे.भाविक याठिकाणी आल्यानंतर किमान दोन ते तीन दिवस मुक्कामी राहिले पाहिजे.तरच येथील हॉटेल इंडस्ट्रीजला ऊर्जितावस्था मिळेल.

अन्यथा वर्षातील ठराविक उत्सव सोडले तर शिर्डीत शुकशुकाट पहावयास मिळत असतो.त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.विश्वप्रसिध्द श्री साईबाबा संस्थानच्या वतीने लेझर शो गार्डन साकारण्यात येणार होते परंतु मागील दहा वर्षांपासून या प्रकल्पास तांत्रिक कारणांमुळे विलंब होत आहे.शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी शहरातील पश्चिम बाजूस असलेल्या
शेती महामंडळाची सुमारे तीस एकर जागा शिर्डी नगरपरिषदेस मिळाली असल्याचे श्री दिघे यांनी सांगितले.नुकताच सदरील जागेसंदर्भात राज्य शासनाने जिआर काढला आहे.

kamlakar

याठिकाणी शिर्डी नगरपरिषदेच्या माध्यमातून बिओटी तत्वावर दहा एकर जागेत भव्य लेझर शो गार्डन बनविण्यात येणार आहे.तर सन १९१८ मध्ये साईबाबा हयातीत असतांना त्यावेळची शिर्डी गांव आणी बाबांचा दैनंदिन नित्यक्रम हा चलचित्राची ( रोबोट ) उभारणी करण्यात येणार आहे.यामुळे भाविकांना प्रत्यक्षात साईबाबांच्या सहवासात आल्याचा भास होणार आहे.अशाच पध्दतीने भव्य थीम पार्क देखील उभारण्यात येणार आहे.यासाठी प्रख्यात डिझायनर यांच्याशी चर्चा करणार आहेत.यामाध्यमातून साईभक्तांसाठी एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे

.राहाता तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदार संघातील शिर्डी नगरपरीषदेचा नावलौकिक राज्यातच नव्हे तर देशात पोहचला आहे.त्याअनुषंगाने आलेल्या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात शिर्डी नगरपरिषद प्रशासन कटाक्षाने भुमिका निभावत आहेत.नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौरा झाला.यादौ-यात साईबाबा संस्थानच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर नगरपरीषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या गार्डनमधील साईबाबांची मुर्ती याबरोबरच पालखी आणी प्रवेशद्वार लक्षवेधी ठरले आहे.

शिर्डी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अनेक विकासाची कामे सुरू आहेत.शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या
अनेक वर्षांपासून असलेल्या लेझर शो प्रकल्पाचे स्वप्न आता शिर्डी नगरपरीषदेच्या माध्यमातून पुर्ण होणार आहे.हा प्रकल्प बिओटी तत्वावर चालविण्यासाठी साईभक्त आनंद महिंद्रा, मुकेश अंबानी, टाटा यांसारख्या मोठ्या उद्योगपतींना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button