Letest News
जिल्ह्यातील पाच गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे! मग बड्या कथित पुरवठादारांना अभय कोणाचे? बंगालच्या साईभक्ताने अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी साई आश्रयातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आ... साई मंदिरात नावाचा खेळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नावाने एक्झिट गेटमधून प्रवेश साईचरणी तब्बल ९४ लाख ८६ हजारांचे सुवर्ण-रजत घड्याळ अर्पण! राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म...
अ.नगरक्राईम

जिल्ह्यातील पाच गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे! मग बड्या कथित पुरवठादारांना अभय कोणाचे?

sai nirman
जाहिरात

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम उघडली असून, पारनेर, राहुरी आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ४७ हजार ४२५ रुपये किमतीचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही आरोपी फरार झाले आहेत.

DN SPORTS

जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार केली होती.

kamlakar

राहता येथे लुटे याच्यावर कारवाई होते, मग बंटी लहामगे, साहिल आणि अनिकेत यांच्या कथित भूमिकेची चौकशी करण्यास प्रशासनाला अडचण काय? या नावांबाबत प्रशासनाकडे माहिती किंवा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत का? असल्यास त्यावर काय कारवाई झाली? नसेल तर गुटख्याची पुरवठा साखळी शोधण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

किरकोळ विक्रेताच गुन्हेगार, मग पुरवठादारांचे काय?

गुटखा विक्री करणाऱ्या छोट्या दुकानदारांवर कारवाई करणे सोपे आहे; परंतु प्रतिबंधित गुटख्याचा साठा कुठून येतो, कोण पुरवठा करतो, कोणत्या मार्गाने माल तालुक्यात पोहोचतो आणि या व्यवसायामागे आर्थिक ताकद कोणाची आहे, याचा तपास करणे हेच खरे पोलिसांसमोरील आव्हान आहे.

किरकोळ विक्रेत्यांकडून गुटखा जप्त करून कारवाईची आकडेवारी दाखवायची आणि पुरवठ्याच्या मुळाशी जाण्याचे टाळायचे, असा प्रकार सुरू असेल तर तो अत्यंत गंभीर आहे. पुरवठादारांपर्यंत तपास पोहोचत नसेल, तर या कारवाईमागील प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

मोठ्या माशांना हात घालण्याचे धाडस दाखवणार कोण?

प्रतिबंधित गुटख्याचा व्यवसाय केवळ एखाद्या किरकोळ दुकानदाराच्या जोरावर चालू शकत नाही. त्यामागे पुरवठा, साठवणूक, वाहतूक आणि वितरणाची साखळी असण्याची शक्यता आहे. मग या साखळीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक नेमले आहे का? संशयित पुरवठादारांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालाच्या स्रोतांची तपासणी होणार का?

दैनिक साईदर्शनचा थेट सवाल!

  • किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होते, मग कथित होलसेल पुरवठादारांची चौकशी का नाही?
  • बंटी लहामगे, साहिल आणि अनिकेत यांच्या कथित भूमिकेची पडताळणी कधी होणार?
  • गुटख्याचा माल राहता तालुक्यात आणणारे आणि वितरित करणारे कोण?
  • कारवाई केवळ दुकानांपुरतीच की गुटख्याच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर होणार? पोलिसांनी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याची वेळ आली आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून गुटखाबंदी यशस्वी झाल्याचा दावा करता येणार नाही. पुरवठ्याच्या मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास झाला पाहिजे. संबंधितांची नावे समोर आली असतील तर त्यांची कायदेशीर पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

लहान विक्रेत्यांवर कारवाईचा बडेजाव कशासाठी? गुटख्याच्या मोठ्या पुरवठा साखळीला हात घालण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार कधी? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत!

या पथकांनी १२ नोव्हेंबर रोजी पारनेर, राहुरी आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुटखा विक्रीच्या ठिकाणांची माहिती काढून एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पारनेरमध्ये दोन, राहुरीमध्ये दोन आणि लोणी येथे एक अशा पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

पारनेरमध्ये दोन ठिकाणी कारवाई

पारनेर तालुक्यात देवीभोयरे येथील शंकर देविदास सरडे याच्याकडून ३ हजार ३४५ रुपयांचा, तर नरसाळवाडी, शिरापूर येथील प्रताप माणिकचंद गुगळे याच्याकडून ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत अन्य दोन आरोपी फरार आहेत.

राहुरीत सर्वाधिक १८ हजार ६६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त

राहुरी तालुक्यातील कनगर येथील विजय बाळासाहेब पावसे याच्याकडून १८ हजार ६६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात कोल्हार येथील सिद्धार्थ कैलास लुटे आणि राहुरी खुर्द येथील पवन दगडूसिंग गिरासे फरार आहेत. दुसऱ्या कारवाईत राहुरी फॅक्टरी येथील रवींद्र जगन्नाथ नालकर याच्याकडून ३ हजार १५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील वसीम सलीम तांबोळी फरार आहे.

लोणीतही छापा; कोल्हारच्या वसीम तांबोळीवर गुन्हा

लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत कोल्हार येथील वसीम सलीम तांबोळी याच्याकडून १७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एलसीबीची धडक मोहीम सुरूच

या पाचही कारवायांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णू भागवत, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आत्तार, विजय पवार, भगवान थोरात, योगेश कर्डीले आणि महादेव भांड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची मोहीम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button