Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विखे पाटील संतप्त

शिर्डी | प्रतिनिधी
“भारतात पाडलं तरी आम्ही स्वीडनमध्ये खासदार झालो…” माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्याने विखे पाटील कुटुंबातील राजकीय श्रेयाचा वाद चांगलाच पेटला आहे. कारण सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यावर खुद्द स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे पाटील यांनीच थेट आक्षेप घेतला आहे. PTIशी बोलताना नीला यांनी गेल्या दशकभरातील कौटुंबिक दुराव्याचा स्पष्ट उल्लेख करत आपल्या निवडणूक विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.
सुजय विखे पाटील यांनी २३ सप्टेंबर रोजी कोल्हार येथील जाहीर कार्यक्रमात “आम्हाला खासदारकीपासून कोणी लांब ठेवू शकत नाही. भारतात पाडलं तरी आम्ही स्वीडनमध्ये खासदार झालो,” असे वक्तव्य केले होते. याच भाषणात त्यांनी विखे कुटुंबाच्या राजकीय वारशाचा उल्लेख करत खासदारकी विखेंच्या रक्तात असल्याचेही म्हटले. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ चर्चेत आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


नीला विखे पाटलांचा थेट सवाल— “संबंधच नाहीत, मग श्रेय कशाचे?”
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नीला विखे पाटील यांनी PTIला सांगितले की, सुजय विखे पाटील यांचा व्हिडीओ कोणीतरी त्यांना पाठवला आणि तो पाहून आपल्याला आश्चर्य वाटले.
त्यांनी स्पष्ट केले की, मागील दहा वर्षांहून अधिक काळ काका राधाकृष्ण विखे पाटील किंवा चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क नाही. त्या भारतात नियमित येत असतानाही त्यांची भेट झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नीला यांनी पुढे आपल्या यशाचा आधार घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आणि महाराष्ट्रातील विखे कुटुंबाचे राजकारण वेगळे असून त्यांच्या राजकीय भूमिका व पक्षीय निष्ठाही वेगळ्या आहेत.


“त्यांचे राजकारण वेगळे; माझा पक्ष मी सोडणार नाही!”
नीला विखे पाटील यांनी PTIशी बोलताना आपल्या आणि काका-चुलत भावाच्या राजकारणातील फरकावरही भाष्य केले. “त्यांचे राजकारण वेगळे आहे. मी माझा पक्ष कधीही बदलणार नाही. त्यांनी पक्ष बदलले आहेत,” असे त्यांनी म्हटले. हा त्यांचा वैयक्तिक राजकीय दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान, नीला खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना फोन करून अभिनंदन केले, हेही नीला यांनी मान्य केले. मात्र, अभिनंदनाच्या पलीकडे कौटुंबिक किंवा राजकीय संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सुजयंच्या वक्तव्याने उघडले घरातील राजकीय अंतर!
एका बाजूला “विखे कुटुंबातील सदस्य स्वीडनमध्ये खासदार झाला” असे सांगत सुजय विखे पाटील यांनी या विजयाचा उल्लेख केला; तर दुसऱ्या बाजूला त्याच कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी “दहा-बारावर्षांपासून संपर्क नाही आणि माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे,” अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ राजकीय टोलेबाजी न राहता विखे कुटुंबातील जुना दुरावा आणि नव्या राजकीय श्रेयाच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे.
स्वीडनच्या संसदेत नीला विखे पाटील यांचा विजय त्यांच्या स्वतःच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे; मात्र त्या विजयाच्या श्रेयावरून महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबातच आता वेगळीच चर्चा रंगली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button