Letest News
रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव! साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे...
राजकीयशिर्डी

कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता

श्री साईबाबा संस्थान, शिर्डीच्या समाधी मंदिरात कर्तव्य बजावत असताना मंदिर विभागातील गुरुजी (पुजारी) श्री. मयूर कुलकर्णी यांना मंदिर परिसरात सोन्याची अंगठी आढळून आली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ही अंगठी श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा करून आपली प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठा जपली.
सदर सोन्याच्या अंगठीचे वजन ४.८०० ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत ६५ हजार रुपये असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली.
मौल्यवान वस्तू परत मिळवून देण्याची परंपरा
शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. या भक्तांच्या मौल्यवान वस्तू मंदिर परिसरात हरवल्यास त्या सुरक्षितपणे संस्थानच्या ताब्यात घेऊन संबंधित भाविकाचा शोध घेऊन परत करण्याची कार्यपद्धती संस्थानकडून राबविली जाते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, मंदिरात कर्तव्य बजावणाऱ्या पुजाऱ्यांना संस्थानकडून नियमित मानधन अथवा वेतन दिले जाते. त्यामुळे मंदिरात सापडलेली मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम ही वैयक्तिक दक्षिणा न मानता ती संस्थानच्या संरक्षण यंत्रणेकडे जमा करून संबंधित भाविकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली जाते.
प्रामाणिकतेमुळे साईभक्तांचा विश्वास अधिक दृढ
श्री साईबाबा संस्थानच्या या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे साईभक्तांच्या मनात संस्थानबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मंदिर परिसरात सापडलेल्या मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे संस्थानकडे जमा करून त्या संबंधित भाविकांना परत मिळवून देण्याच्या या परंपरेत श्री. मयूर कुलकर्णी यांनी दाखविलेली प्रामाणिकता निश्चितच कौतुकास्पद आहे.
दरम्यान, श्री. मयूर कुलकर्णी यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button