Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
राजकीयशिर्डी

शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेप्रती समर्पित पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांचा आज वाढदिवस. आपल्या शांत, संयमी स्वभावासोबतच कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कठोर भूमिका घेणारे आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करणारे दबंग अधिकारी म्हणून त्यांची शिर्डी परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना जनतेच्या समस्या समजून घेणे, नागरिकांना विश्वास देणे आणि कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे, या त्रिसूत्रीवर गलांडे साहेब काम करताना दिसतात. त्यामुळे एकीकडे त्यांच्या शांत व संयमी व्यक्तिमत्त्वाची चर्चा असताना दुसरीकडे गुन्हेगारीविरोधातील त्यांच्या कठोर भूमिकेचेही कौतुक केले जाते.
शिर्डी ही साईभूमी असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. देशभरातून येणाऱ्या साईभक्तांची सुरक्षितता, स्थानिक नागरिकांचा विश्वास आणि शहरातील शांतता कायम राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. ही जबाबदारी पार पाडताना गलांडे साहेब आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, निस्सीम साईभक्त म्हणूनही त्यांची ओळख आहे. साईबाबांच्या पवित्र भूमीत सेवा करण्याची संधी मिळाल्याचा भाव त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून जाणवतो. शांत स्वभाव, संयमी वागणूक आणि प्रसंगी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची क्षमता यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व आगळेवेगळे ठरते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, साईभक्त आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सेवाकार्यात निरंतर यश लाभावे, अशी साईचरणी प्रार्थना करण्यात येत आहे.
रणजीत गलांडे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी, गुन्हेगारीवर आणखी प्रभावीपणे अंकुश बसावा आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ओम साई राम! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, गलांडे साहेब!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button