Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
शिर्डी

शिर्डी | देशभर उभारली जाणार साईबाबांची सेम-टू-सेम मंदिर..

साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आहे.

शिर्डी: साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी साई संस्थानकडून देशभर साई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डी सारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणार्‍या साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे ती रक्कम मदत करण्याचा साई संस्थान विचार करत असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

श्रीसाई मंदिर निर्माण धोरण – श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी श्रीसाई संस्थानकडून देशभर श्रीसाई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे श्रीसाई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्‍के रक्‍कम अथवा 50 लाखापेक्षा जी रक्‍कम कमी आहे ती रक्‍कम मदत करण्याचा श्रीसाई संस्थान विचार करत आहे.

डोनेशन धोरण   यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक दिवशी आरती व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी श्रीसाई संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार आहे. यापूर्वी श्रीसाई समाधीवर शाल पांघरण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत श्रीसाई संस्थानने प्राथमिक प्रस्‍ताव तयार केलेला आहे.

DN SPORTS

श्रीसाई मंदिर असोसिएशन धोरण जगभरातील व देशभरातील श्रीसाई मंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही श्रीसाई संस्थानचा विचार सुरू आहे.

उपरोक्‍त धोरणांबाबतची माहिती संस्‍थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्‍थळावर देण्‍यात आलेली आहे. या तिन्‍ही धोरणांबाबत भाविक व ग्रामस्थांच्‍या सूचना ceo.ssst@sai.org.in या ई-मेलवर मागवण्यात ये आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button