Letest News
समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का?
क्राईमशिर्डी

समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्ग | प्रतिनिधी :
समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावरील किमी क्रमांक ५३८.५ दरम्यान मालट्रक कंटेनरचे पुढील टायर अचानक फुटल्याने कंटेनरचे नियंत्रण सुटले आणि तो दुसऱ्या वाहनावर आदळला. धडक होताच वाहनाने पेट घेतल्याने परिसरात आगीचा मोठा भडका उडाला.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कंटेनरमध्ये CNG असल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या तांडवामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या भीषण अपघातात गुलशर अली नावाच्या इसमाचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


टायर फुटले अन् नियंत्रण सुटले
प्राथमिक माहितीनुसार, मालट्रक कंटेनरचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर दुसऱ्या वाहनावर आदळला. धडकेनंतर लागलेल्या आगीने काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण केले. CNG कंटेनर असल्याच्या माहितीनंतर अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणांनी अधिक खबरदारी घेत घटनास्थळी कारवाई सुरू केली.


महामार्गावर खळबळ; तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी व आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघात नेमका कशामुळे झाला, कंटेनरमध्ये नेमका कोणता माल होता आणि आगीचे कारण काय, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख व अपघातातील अन्य बाबींबाबत अधिकृत माहिती संबंधित यंत्रणांकडून मिळाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button