Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास!

शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबांच्या पालखी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. पालखी रोडवरील चावडीसमोर हा प्रकार घडला. या घटनेत तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या चोरीस गेल्या आहेत.
याप्रकरणी गोव्यातील रहिवासी रोशन रमाकांत अगरवाडेकर (वय ६०) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. FIR क्रमांक ०६६६/२०२६ असा आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पालखी दर्शन घेत असताना साडीचा पदर ओढला; गळ्यातील चैन गायब
फिर्यादी रोशन अगरवाडेकर या आपल्या मुलासह व कुटुंबीयांसोबत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी २८ जुलै रोजी शिर्डीत आल्या होत्या. २९ जुलै रोजी सायंकाळी त्या श्री साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चावडीजवळ गेल्या असता मोठी गर्दी झाली होती.
पालखीचे दर्शन घेत असताना कोणीतरी त्यांच्या साडीचा पदर ओढल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी मागे येऊन पाहिले असता गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूला शोध घेऊनही चैन मिळाली नाही.


दुसऱ्या महिलेचीही १८ ग्रॅमची सोनसाखळी चोरीला
याच गर्दीत यशोदा रामेश्वर ठाकरे (वय ४२, रा. दमोह, बालाघाट, मध्यप्रदेश) यांच्याही गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीस गेल्याचे समोर आले. दोन्ही महिलांच्या सोनसाखळ्या एकाच पालखी दर्शनाच्या गर्दीत चोरीला गेल्याने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
फिर्यादीनुसार, ३० ग्रॅम सोन्याच्या चैनची किंमत १ लाख २० हजार रुपये, तर १८ ग्रॅम सोन्याच्या चैनची किंमत ६५ हजार रुपये असून, दोन्ही मिळून १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.


भाविकांच्या गर्दीत सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट?
शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. पालखी, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दी आणखी वाढते. अशा गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पालखी मार्ग व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरट्यांचा माग काढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. भाविकांनीही गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने परिधान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button