Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
राजकीयशिर्डी

अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन

कोपरगाव | प्रतिनिधी :

sai nirman
जाहिरात

अयोध्या येथील राममंदिरातील दानपेटीतील कथित दरोड्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आज, शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

या आंदोलनादरम्यान रामरक्षा स्तोत्राचे पठण करून निषेध व्यक्त करण्यात येणार असून शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या आवाहनानुसार शहरातील आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, विविध हिंदू संघटना, हिंदूप्रेमी नागरिक तसेच पक्षाच्या सर्व अंगीकृत शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

DN SPORTS

kamlakar

बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून शोभायात्रेला सुरुवात

शिवसेनेच्या नियोजित कार्यक्रमानुसार शोभायात्रेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून सुरुवात होऊन संकटमोचक हनुमान मंदिरापर्यंत ती नेण्यात येणार आहे. त्यानंतर संकटमोचक हनुमान मंदिर येथे रामरक्षा स्तोत्र पठण व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

अयोध्येतील राममंदिराशी कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत. त्यामुळे मंदिरातील दानपेटीबाबत समोर आलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

“हिंदू समाजाच्या श्रद्धेचा विषय; दोषींवर कठोर कारवाई करा”

राममंदिरातील दानरकमेच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. मंदिरातील दानपेटीशी संबंधित गैरप्रकाराची पारदर्शकपणे चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगावात होणाऱ्या आंदोलनाकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सर्व हिंदुत्ववादी संघटनांना उपस्थितीचे आवाहन

या आंदोलनात केवळ शिवसैनिकांनीच नव्हे तर सर्व हिंदू संघटना, हिंदूप्रेमी नागरिक आणि रामभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक : ८ ऑगस्ट २०२६वेळ : सायंकाळी ५ वाजताठिकाण : संकटमोचक हनुमान मंदिर, समता पतसंस्थेजवळ, कोपरगाव

अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात होणाऱ्या या आंदोलनातून शिवसेना नेमकी कोणती भूमिका मांडते आणि प्रशासनाकडे कोणत्या मागण्या करते, याकडे आता लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button