Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
राजकीयशिर्डी

गुजरात येथील बेट द्वारकेप्रमाणे शिर्डीत सर्वच मस्जिदींचे अतिक्रमण भुईसपाट करणार का? की त्यामध्येही दुजाभाव करणार!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीमध्ये झालेले अनधिकृत बांधकाम काढण्यासंदर्भात शिर्डी नगरपरिषदेने कारवाई सुरू केली आहे .मात्र ही कारवाई करत असताना दुजाभाव होत असल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणाविरोधात कारवाई करताना असा नगरपालिका प्रशासनाकडून दुजाभाव होऊ नये. सरसकट अतिक्रमण काढावे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशी मागणी साईभक्त ग्रामस्थांकडून होत आहे.
गुजरात मधील बेट द्वारका या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतेच बुलडोझरच्या साह्याने सरकारी जमिनीवरील झालेले सर्व अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यामध्ये मशीदे, मजारों तसेच धार्मिक स्थळेही आहेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आले आहे.

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अतिक्रमण मोहीम चालू आहे .मात्र शिर्डी सारख्या ठिकाणी नगर परिषद अतिक्रमण काढताना भेदभाव करीत असल्याचे दिसून येत आहे. शिर्डीत काही अतिक्रमण हटविण्यात आले आहेत. मात्र काही अनधिकृत बांधकामेही नोटिसा देऊनही तशीच आहेत.काही प्रतिष्ठित व धन दांडग्यांची अनधिकृत बांधकामांना नगरपालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

शिर्डी नगर परिषदेमध्ये पिंपळवाडी रोडवर हॉटेल शिर्डी पार्क इन मिनी पंजाब रेस्टॉरंट चे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हॉटेल मालकाला नगरपरिषदेने सन 2019 ला तीन वेळेस लेखी नोटीस दिली . अनेकदा या संदर्भात मागणी करण्यात आली. तरीही ते अतिक्रमण पाडण्यात आलेले नाही. अशीच नोटीस आता शिर्डी येथील पुनमनगर भागातील महम्मदिया जमात खाना ट्रस्टच्या महम्मदिया मस्जिद ट्रस्टला दिले असून त्यामध्ये म्हटले की,


शिर्डी नगरपरिषद हद्दीतील मिळकत क्रं. SHIR00008717 मधील जागेत सदर ठिकाणी आपण अनाधिकृतपणे बांधकाम केलेले आहे. सदरचे बांधकाम करण्यापूर्वी शिर्डी नगरपरिषदेकडून एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR 2020) नुसार रितसर बांधकाम परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र आपण विनापरवाना अनाधिकृतपणे सदर ठिकाणी बांधकाम केले आहे.

सदर अनाधिकृत बांधकामामुळे परीसरातील नागरीकांना ध्वनी प्रदुषणाचा व इतर त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरीक करत आहेत.
त्यानुसार आपणास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 189 अन्वये व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54 व 55 अन्वये नोटीस देण्यात येते की, सदरचे अनाधिकृत बांधकाम 15 दिवसात स्वतःहून

निष्कासित करणेत यावे. अन्यथा विहित मुदतीनंतर केव्हाही नगरपरिषदेद्वारे सदर बांधकाम निष्काषित करुन त्याचा सर्व खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल . असे या नोटीसीत म्हटले आहे. सदर नोटीसीद्वारे पंधरा दिवसात हे अनधिकृत बांधकाम काढण्याचे सुचित करण्यात आले आहे.

मात्र शिर्डी नगरपरिषद प्रशासन हे अतिक्रमण नक्की काढणार का? की हॉटेल शिर्डी पार्क इन मिनी पंजाब रेस्टॉरंट यांच्यासारखेच फक्त नोटीस देणार मात्र कारवाई काही नाही! असे धोरण ठेवणार का? असा सवाल आता साईभक्त व येथील नागरिकांकडून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button