Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
शिर्डी

शिर्डी येथील नगर मनमाड महामार्ग लगतच्या हॉटेल इंटरनॅशनल पुढील अनधिकृत बांधकाम पाडण्याची समीर वीर यांची मागणी!

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी येथील नगर मनमाड महामार्गाच्या लगत असणाऱ्या हॉटेल इंटरनॅशनलचे पुढील अनधिकृत  बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी शिर्डी येथील अखिल भारतीय लहुजी सेनेचे राज्य कार्याध्यक्ष
समीर रामचंद्र वीर यांनी केले आहे.
शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात समीर वीर यांनी पुढे म्हटले आहे की,
शिर्डी नगरपरिषदेच्या हद्दीत असलेले हॉटेल इंटरनॅशनलचे मालक आहुजा यांनी नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेता आपल्या हॉटेल समोर बेकायदेशीर एकाबाजूला  रेस्टॉरंट व दुसऱ्या बाजूला आलिशान शोरूम बनवले होते.

sai nirman
जाहिरात

त्याची आपण सन २०२० ला माहिती अधिकारात माहिती घेतली होती. तेव्हा मला नगरपरिषदेने माहिती दिली होती कि, ह्या इंटरनॅशनल हॉटेल समोरील रेस्टोरंट आणि शोरूम दुकानासाठी नगरपरिषदेची कुठलीही परवानगी नाही म्हणून मी सन २०२० ला नगर परिषदेला अर्ज केला होता कि, हे विनापरवाना अनधिकृत बनवलेली दुकाने पाडण्यात यावी .त्यावर नगर पालिकेने काहीच कारवाई न केल्याने मी नगरपरिषदेसमोर ५ दिवस आमरण उपोषण केले होते.मला नगर परिषदेने लेखी पत्र दिल्याने मी उपोषण सोडले होते .त्यानंतर शिर्डी नगरपरिषदेने सन २०२१ मध्ये पोलीस संरक्षण घेऊन ते शोरूम दुकान आणि रेस्टोरंट तोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्या मालकाने त्याच ठिकाणी पुन्हा रेस्टोरंट बनवले आहे. तेव्हा हे हॉटेल इटरनॅशनल समोरील अनधिकृत बनवलेले हॉटेल रेस्टॉरंट त्वरित पाडण्यात यावे, अशी मागणी समीर रामचंद्र वीर शिर्डी यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद शिर्डी यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी
पोलीस आयुक्त सो. मुंबई,
  महसूल आयुक्त सो नाशिक विभाग. नाशिक,
जिल्हाधिकारी सो अहमदनगर,
पोलीस अधीक्षक सो अहमदनगर,
 उपजिल्हाधिकारी, शिर्डी विभाग शिर्डी ,प्रांताधिकारी शिर्डी विभाग शिर्डी ,तहसीलदार
राहता,यांना सुद्धा ही निवेदने पाठवली आहेत.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button