Letest News
शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ-
क्राईमशिर्डी

#AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून लैंगिक शोषण पोलिसांच्या गुप्त तपासाने उघड केला भयंकर चेहरा

गेल्या तीन दिवसांपासून लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरातचे कारनामे आणि व्हिडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. खर तरं बुवा तेथे बाया ही जुनी म्हण खरी असली तरी त्या बाया कुणाची पत्नी, बहीण, आई होती याचं भान महिला आयोगाच्या अध्यक्षांना असायला हवे होते. अर्थात या नराधमाने अनेक महिला तसेच तरुणींवर अत्याचार तसेच लैंगिक शोषण केले आहे.58 नव्हे तर त्यावरून जास्त व्हिडिओ क्लिप्स असण्याची शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सर्वात महत्वाचे म्हणजे हे प्रकरण शिर्डी पोलिस स्टेशनला १८ फेब्रुवारी रोजी एका महिलेने याच लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरात च्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या विरोधात अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या बद्दल तक्रार केली होती. मात्र हे प्रकरण शिर्डी पुरतं मर्यादित नव्हतं कारण या प्रकरणाची दखल पोलिसांनी गांभीर्याने घेऊन गेल्या एक महिन्यांपासून अतिशय गुप्त तपास करत सर्व पालमुळ शोधून काढली आणि मंग एकच धमाका झाला तो म्हणजेच स्वतःला राजकीय भविष्यकार समजणाऱ्या कॅप्टन अशोक खरात ला अटक केली.

अर्थात अनेक चॅनल्सवर वेगवेगळ्या बातम्या झळकल्या तरी हे बिंग चव्हाट्यावर येण्याची सुरुवात शिर्डीतून झाली होती हे सत्य लपवता येणार नाही. शिर्डीतील या लिंगपिसाट खरातचे कोण भक्त आहे? कोणते एजेंट हा मोठा भविष्यकार बाबा आहे असं सांगून त्याच्याकडे सर्व समस्यांचे सोलुशन आहे असा प्रचार करून महिला तसेच इतर राजकीय पुढारी, नेते व मंत्र्यांना तिथे जाण्याचा सल्ला देत होते?

आणि याच लिंगपिसाट खरातला शिर्डीत कोट्यवधी रुपयांची जमीन आणि प्लॉट घेण्यास कोणी सांगितले आणि यामागील शिर्डीतील खरात चा एजंट कोण? याचाही पर्दाफाश लवकरच होणार आहे. हे प्रकरण आता राजकीय वर्तुळातील एक मोठं वादळ ठरलं असून, काळी जादू, अंधश्रध्दा, भविष्य याच्या आहारी गेलेले सत्तेमधील मंत्री , उद्योगपती आणि काही शासकीय अधिकारी हे सुद्धा या भोंदू बाबांचे शिकार झाले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असून पोलिसांच्या तपासात पुढे खूप काही धक्कादायक खुलासे बाहेर येणार आहेत.


वास्तविक एरव्ही पोलिसांवर खापर फोडणाऱ्या समाजाला कदाचित माहीत नसेल पण अहिल्यानगर आणि नाशिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे केलेल्या गुप्त तपासामुळेच लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरात याचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. मात्र त्या अगोदर आणि नंतर किती कुटुंबे आणि महिलांचे जीवन उध्वस्त झाले याचा विचार न केलेला बरा. अर्थात पुरोगामी संस्कृती असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रात मंत्री, उद्योगपती आणि शासकीय अधिकारी सुद्धा अंधश्रद्धेवर आजही विश्वास ठेऊन अशा नराधमाला आजपर्यंत पाठबळ देत होते हेच आमचे दुर्दैव म्हणावे लागेल.

पत्रकार राजेंद्र भुजबळ, शिर्डी
8888777711

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button