Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

अंत्यविधी की रॅली? देशद्रोही बंटी जहागीरदारच्या अंत्यविधी आड गुन्हेगारीचे शक्तीप्रदर्शन

श्रीरामपूर | दैनिक साई दर्शन
हा अंत्यविधी होता की गुन्हेगारीची रॅली?
हा शोकसोहळा होता की दहशतीचे उघड प्रदर्शन?
देशविघातक कृत्यांचे आरोप असलेल्या बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला जमलेला प्रचंड जमाव पाहता, संपूर्ण श्रीरामपूरमध्ये हाच संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपीच्या अंत्यविधीत शक्तीप्रदर्शन, जमावबाजी, भीतीचे वातावरण निर्माण होणे म्हणजे कायद्याला थेट आव्हान असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.
या संपूर्ण प्रकाराचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट उल्लेख करत तीव्र शब्दांत समाचार घेतला.
“श्रीरामपूर गोळीबारानंतर देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीच्या समर्थनार्थ जमणारा जमाव समाजासाठी अत्यंत घातक आहे. गुन्हेगारी मानसिकतेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
बंटी जहागीरदार याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असताना, त्याच्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणात लोक जमणे, काही ठिकाणी घोषणाबाजी, तर काही ठिकाणी दहशत निर्माण करणारे दृश्य पाहायला मिळणे, हा सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर थेट घाला असल्याचे बोलले जात आहे.
हा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरचा शोक नसून,
👉 गुन्हेगारांना नायक ठरवण्याचा प्रयत्न,
👉 गुन्हेगारीला सामाजिक मान्यता देण्याचा धोका,
👉 तरुण पिढीला चुकीचा संदेश
असे गंभीर परिणाम करणारा असल्याचा आरोप प्रशासन पातळीवरून होत आहे.
“गुन्हेगार कितीही कुख्यात असो, कितीही लोक त्याच्या मागे उभे राहिले तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. गुन्हेगारांच्या समर्थनार्थ जमाव गोळा करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल,” असा थेट आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला दिला आहे.
गुटखा, अवैध धंदे, अमली पदार्थांचा व्यापार आणि बेकायदेशीर शस्त्रांमधून उभ्या राहिलेल्या गुन्हेगारी साखळीमुळेच असे “अंत्यविधी की रॅली?” असे चित्र उभे राहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर लगाम घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही विश्लेषण, व्हिडीओ फुटेज तपासणी आणि विशेष पथके तात्काळ सक्रिय करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीवेळी जमलेल्या जमावाची ओळख, सहभाग, घोषणाबाजी आणि कथित शक्तीप्रदर्शनाची सखोल चौकशी अटळ मानली जात असून, गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तींवर मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button