Letest News
लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड
अ.नगरशिर्डी

कु. रोशनी जितेश लोकचंदानी प्रीतिसुधाजी इंग्लिश मेडियम स्कूल राहता मध्ये बारावीत प्रथम! सर्व क्षेत्रातून तिचे होत आहे अभिनंदन!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील दैनिक साईदर्शनचे संस्थापक संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांची कन्या कु. रोशनी ही प्रीतिसुधाजी डांगे हायस्कूल राहता येथे बारावी इंग्लिश मीडियम स्कूल मधून प्रथम आली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. तिचा ठीक ठिकाणी सत्कार होऊन तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनीही या संस्थेच्या वतीने रोशनी जितेश लोकचंदानी ही प्रतिसुधाजी डांगे हायस्कूल मधून बारावीत प्रथम आल्याबद्दल तिचा सत्कार केला. तिचे अभिनंदन करत तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विठ्ठलराव पवार म्हणाले की जितेश लोकचंदानी यांनी अनेक सुखदुःखातून मार्गक्रमण केले आहे.

अनेक संकटांनाही त्यांनी तोंड दिले आहे. चांगले वाईट दिवस अनुभवले आहे. त्यामुळे त्यांना समाजातील सर्व थरातील जनतेची माहिती आहे. आणि अशा कुटुंबात जन्मलेल्या त्यांच्या मुलांनाही या सर्व परिस्थितीची जाणीव आहे ‌ मुळातच सर्व कुटुंब सुसंस्कृत , सुशिक्षित आहे. सर्व मुले अतिशय हुशार आहेत.

मुलगा भारतात टॉपचे समजले जाणारे मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात कायद्याचे शिक्षण घेत आहे. तेथेही तो प्रत्येक वर्षी टॉप मध्ये आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे. सर्व मुली शिक्षणात पुढे आहेत. गुणवत्तेत अग्रेसर आहेत. त्यातच कु. रोशनी ही प्रीतीसुधाजी डांगे हायस्कूल राहता येथे इंग्लिश मीडियम स्कूल बारावी मध्ये शिकत होती .ती यावर्षी बारावी परीक्षे मध्ये ‌या विद्यालयात प्रथम आली आहे.

तिचे सर्वत्र कौतुक होत असताना शिर्डी पत्रकार संघ तसेच श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे वतीने तिचा सन्मान करण्यात आला. तिचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी कु. रोशनी जितेश लोकचंदानी हिने आपल्या या यशामागे आपले आई-वडील, शिक्षक यांचे मोठे योगदान आहे.

असे सांगून माझा जो साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने सत्कार केला त्याबद्दल तिने धन्यवाद मानले. व घरची परिस्थिती कशीही असो, कोणतेही संकट येवो, मात्र जिद्द आणि प्रयत्न सातत्याने ठेवले तर नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहत नाही. असे तिने इतर विद्यार्थ्यांनाही एक संदेश यावेळी दिला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button