Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
क्राईमशिर्डी

इंजेक्शनने केला ‘अपंग’! — डॉक्टरकडून रुग्णाला आयुष्यभराचा चटका” अवैद्य उपचारांचा बळी ठरलेला निमगाव कोराळेचा रुग्ण-सेप्टिकमुळे पाय जाण्याची भिंती डॉक्टर मोकळा फिरतोय!

शिर्डी (विशेष प्रतिनिधी) —
पायातील साध्या फोडावर उपचार घ्यायला गेलेल्या माणसाला शेवटी पाय गमवावा लागतो की काय असा दुर्दैवी प्रसंग एका गरीब कुटुंबावर ओढावला आहे
हे वाचून अविश्वास वाटेल, पण हे सत्य आहे — आणि तो पाय नाहीसा करणारा डॉक्टर पाच गावात प्रसिद्ध आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

निमगाव कोराळे येथील रुग्ण काही दिवसांपूर्वी सावळीविहिर येथे डॉक्टराकडे औषधोपचारासाठी गेला होता
या डॉक्टराने रुग्णाला कमरेजवळ इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाला तीव्र रिअ‍ॅक्शन आली. काही तासांतच मांडी आणि कंबरजवळील भाग सेप्टिक होऊन काळवंडला. नातेवाईकांनी गडबड लक्षात आणून दिली, तर हा डॉक्टर म्हणाला — “घाबरू नका, मी आहे ना! परत उपचार केले


दुसरीकडे कुठे जाऊ नका असं सल्ला देण्यास देखील तू विसरला नाही आणि इथेच खरी संकटाची सुरुवात झाली या आत्मविश्वासानेच रुग्णाची होरपळ झाली . काही दिवसांतच पाय सडू लागला आणि अखेर परिस्थिती इतकी गंभीर झाली की, पाय वाचवण्यासाठी लाखोंचा खर्च डॉक्टरलाच करावा लागला!
रुग्णाला नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे सुरुवातीचा खर्च या डॉक्टराने केला, पण काही दिवसांनी तोच डॉक्टर म्हणाला — “आता माझं काही देणंघेणं नाही, तुम्ही बघा तुमचं!”


रुग्णाच्या घरच्यांनी शेवटी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू ठेवले.आता तो रुग्ण जिव वाचवण्यासाठी झुंजतोय आणि डॉक्टर मात्र मोकळेपणाने गावात फिरतोय! मध्यस्थांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, पण प्रश्न असा आहे की —कर्त्याचा पाय गेला, तर जबाबदार कोण?”
पोलीसही शांत, प्रशासनही गप्प आणि गावकऱ्यांत मात्र संतापाचा उद्रेक दिसून येतो आता हा उद्रेक थांबतो की मोठ्या प्रमाणावर वाढतो याकडे काही चळवळीतील कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष आहे

रुग्णाचा पाय सडला, डॉक्टर म्हणतो — माझा दोष नाही

काही अजी-माजी लोकप्रतिनिधीची डॉक्टरसाठी मध्यस्थी?

सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असताना, काही आजी-माजी लोकनियुक्त मंडळी या वादग्रस्त डॉक्टरच्या बचावासाठी पुढे सरसावल्याची चर्चा रंगली आहे.
तक्रार देऊ नये, “आपण बघतो” अशा आश्वासनांनी पीडित कुटुंबावर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गावातील नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button