कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत डाऊच -चांदेकसारे शिव रस्त्याजवळ काल रात्री 8.30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने हिरो होंडा एस.एस.या दुचाकीस (क्रं.एम.एच.15 एस.6720) धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील झापवाडी येथील इसम विजय सुखदेव नवाळे (वय-55) यांचे निधन झाले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ बबन सुखदेव नवाळे (वय -45 ) यांनी दाखल केला आहे.अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक मात्र फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वी पूर्ण झाल्याने या मार्गावरून वाहने वेगाने धावत असून त्यातून अनेक अपघात होत असून अनेक वाहन चालकांच्या जिवितांची व वित्तीय हानी होत आहे.अशीच घटना नुकतीच चांदेकसारे हद्दीत घडली असून यातील मयत दुचाकी चालक हा सिन्नर तालुक्यातील झापवाडी येथील रहिवासी असून तो दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास झापवाडी येथून छत्रपती संभाजीनगरकडे आपल्या हिरो होंडा एस.एस.या दुचाकीवरून जात होता.त्यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली असून त्यात त्यांचे निधन झाले आहे.या प्रकरणी मयताचे लहान भाऊ व फिर्यादी बबन नवाळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.287/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 106(1),281,324 (4)मटार वाहन कायदा कलम184,134,(अ),(ब ) 177 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह व पो.उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पोलीस उपनिरीक्षक कूसारे हे करीत आहेत.