लोणी (प्रतिनिधी) लोणी येथे गांजा विक्री करताना दोन जणांना रंगेहाथ पकडले.
राहाता तालुक्यातील लोणी पोलिस स्टेशन हद्दीतील पी एम टी हॉस्पिटल समोर, हॉटेल पाकीजा मागे,लोणी बू येथे आरोपी अजीज रहमान शेख, वय55 वर्ष, रा.बाभळेश्र्वर ता.राहाता व त्याची पत्नी नादिरा अजीज शेख, वय 50 वर्ष,रा.बाभळेश्र्वर ता.राहाता
हे गांजाची विक्री करताना व स्वतः जवळ गांजा बाळगताना आढळून आले असून त्याचे विरुद्ध येथील लोणी पोलीस स्टेशन गुन्हा र. नं.102/2025 NDPS कलम 8 क सह 20 ब प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. या आरोपीला अटक करण्यात आली आहे,
तसेच लोणी _ संगमनेर रोडवर अचानक नाकाबंदी करून संशतीत रिक्षा, मोटारसायकल व कार , चित्रविचित्र नंबर प्लेट, कर्ण कर्कश सायलेन्सर यांची तपासणी करून एकूण 14000/_ रुपये दंड आकारण्यात आला आहे.

सदर कारवाई वैभव कल्लूबर्वे , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, शिरीष वमने, SDPO शिर्डी यांच्या मार्गदर्शन खाली सपोनी कैलास वाघ,PSI चौधरी,WPSI मोरे,Asi पवार, सांगळे,HC साळवी,शिंदे,सय्यद, काळे,WHC डोलणार ,यांनी केली असून पुढील तपास सपोनी कैलास वाघ करत आहोत.