शिर्डी ते ज्ञानेश्वर मंदिर निमगाव दरम्यान प्रवास करताना एटीएम कार्डसह महिलेची पर्स लंपास!

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी ते श्री ज्ञानेश्वर मंदिर निमगाव दरम्यान एका प्रवासी वाहनातून प्रवास करत असताना एटीएम सह छोटी पर्स गायब करून एका महिलेच्या अकाउंट मधून सुमारे चार हजार रुपये व दोन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ओम पान चोरी गेल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहिती अशी की, सूषमा महेंद्र धनेश्वर राहणार शिर्डी तालुका राहता यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,आपण आपल्या मुलाकडे पुण्याला गेलो होतो. तेथून 25 नोव्हेंबर 2023 रोजी एसटी बसने शिर्डी बस स्टॅन्ड ला आलो . तेथे उतरून पांढऱ्या रंगाच्या व्हन मध्ये मध्ये बसलो. तेथून नगर मनमाड रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ आम्ही उतरलो .आमच्याबरोबर या गाडीतील दोन महिलाही उतरल्या. त्यानंतर आम्ही आपल्या घरी आलो.
नंतर एक तासांनी माझी मोठे पर्स बघितली असता त्या पर्समध्ये असणारी छोटी पर्स गायब होती. त्यामध्ये एटीएम कार्ड व दोन हजार रुपयांचे सोन्याचेओम पान होते. ते गायब झाले आहे. एटीएम मधून चार हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यामुळे माझे एकूण सहा हजार रुपये चोरीस गेल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला सुषमा महिंद्र धनेश्वर यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1053/ २३ नुसार भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.