शिर्डी प्रतिनिधी
उत्तर अहिल्यानगरचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी महिलांनी तृप्ती देसाई यांच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यात त्या महिलांनी सांगितले आहे कि
आम्हाला पदाचे आमिषे दाखऊन रात्रीपर्यंत बेरात्री ढाब्यावर बोलवणं दारू पाजून डान्स करायला लावणे पार्टी करणे आमच्याकडून अशा पद्धतीचे प्रकार जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सुरु आहेत अशी माहिती तृप्ती देसाईंनी माध्यमांसमोर दिलेली आहे त्यात तृप्ती देसाई म्हणाल्या कि वरील पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे
आणि दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्या पोलीस प्रोटेक्शन चा वापर सुद्धा अश्याच कामासाठी केला जात आहे आणि दिनकर हे राधाकृष्ण विखे यांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्या विरोधात लवकर कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटेच गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत
आहिल्यानगर ह्या जिल्ह्याला नाव दिलेले आहे आणि त्याच अहिल्यानगर मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याच्यावर आळा बसला पाहिजे त्यांचा त्वरित राजीनामा घेणे गरजेचे आहे आणि त्यांचे पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचे आहे
मला तक्रार प्राप्त होताच आज सकाळी मी मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे रीतसर तक्रार दिलेली आहे राम शिंदे असतील राधाकृष्ण विखे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे
की यांच त्वरित राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी बनवला आहे धाब्यावर दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा व्हिडीओ पाठवलेला तो सुद्धा मी मुख्यमंत्री यांना पाठवला आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर करून पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे