Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
राजकीयशिर्डी

शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश

शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील आश्वी, सोनई पोलीस ठाणे तसेच शिर्डी साई मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी नवीन प्रभारी पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी एक पोलीस निरीक्षक व तीन सहायक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय मध्यावधी बदल्यांचे आदेश जारी केले.
🛕 साई मंदिर सुरक्षा निरीक्षक सोनवणे यांच्याकडे
आश्वी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांची बदली रिक्त असलेल्या साई मंदिर सुरक्षा, शिर्डी या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे बीडीडीएस (BDDS), शिर्डीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा व बीडीडीएसची पदे काही काळापासून रिक्त होती. या पदांचा तात्पुरता कार्यभार शिर्डी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश येसकर यांच्याकडे होता. आता ही जबाबदारी पूर्णवेळ निरीक्षक संजय सोनवणे यांच्याकडे देण्यात आली आहे.
🚓 आश्वी पोलीस ठाण्याला नवे प्रभारी
निरीक्षक सोनवणे यांच्या बदलीनंतर आश्वी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी राहुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
🔄 सोनई–राहुरी पोलीस ठाण्यांत बदल
▪️ सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांची बदली राहुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
▪️ संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांची नियुक्ती सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून करण्यात आली आहे.
⚖️ प्रशासनाकडून सुरक्षेला प्राधान्य
या बदल्यांमुळे शिर्डी साई मंदिराची सुरक्षा अधिक बळकट होणार असून, कायदा-सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलल्याचे चित्र आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button