
शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डीत साई थीम पार्क जवळ फ्री फोटो काढतो असे सांगून पुण्याच्या साई भक्तांना हातातील सामान बाजूला ठेवण्यास सांगून फोटो काढण्याच्या नादी लावून खाली ठेवलेली पर्स पळवून नेऊन त्यामधील सामान चोरी गेली
असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दिनांक 18.04.2025/388/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे दाखल झाली आहे. यासंदर्भात पोलीसांनी सूत्रे हलवून तात्काळ एकाला साई थीम पार्क जवळून ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याला न्यायालयात नेले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तो सध्या कोपरगाव येथील सब जेल मध्ये आहे. या कामी पो.नि. गलांडे साहेब, API बलैया साहेब, पोलीस नाईक गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल गरदास, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण विशेष कामगिरी केली.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे साई भक्तांमधून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.