Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
Blog

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरा

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरा करण्‍यात आला असून श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. ज्‍योती हुलवळे यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी कुबेर पुजन करण्‍यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरा करण्‍यात आला. दिपावलीनिमित्‍त आज सायंकाळी ०५.०० ते ०६.०० यावेळेत समाधी मंदिराच्‍या गाभा-यात संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. ज्‍योती हुलवळे यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्‍मी-कूबेर पूजन, सरस्‍वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले. याप्रसंगी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, सौ.मा‍लती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, लेखाधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. लक्ष्‍मी-कूबेर पूजन झाल्‍यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्‍तांसाठी दर्शनरांग सुरु करण्‍यात आली. तर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली.


दिपावली उत्‍सवानिमित्‍त भुवनेश्‍वर येथील साईभक्‍त श्री सदाशिव दास श्री साईकृपा चॅरीटेबल ट्रस्‍ट, यांच्‍या वतीने देणगीस्‍वरुपात विद्युत रोषणाई व आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्‍त श्रीमती. पी. श्रीशक्‍ती यांच्‍या देणगीतुन श्री साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली. तसेच आंध्रप्रदेश येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एम. श्रीनिवास राव यांनी मेडीकल फंडासाठी १२ लाख रुपये देणगीचा डी.डी. संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्‍याकडे सुपुर्त केला.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button