Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरराजकीय

आगामी गणेशोत्‍सव, ईद ए मिलादसह इतर सण शांततेत साजरे करावेत जिल्हाधिकारी सालीमठ

The upcoming Ganeshotsav, Eid-e-Milad and other festivals should be celebrated peacefully: Collector Salimath

अहमदनगर, दि.23 ऑगस्ट (जिमाका) – जिल्‍ह्यात आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्‍सव, ईद-ए-मिलाद यासह इतर सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी केले.

sai nirman
जाहिरात
        जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

        यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, म‍हापालिका आयुक्‍त डॉ. यशवंत डांगे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भरती यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

        जिल्‍हाधिकारी सालीमठ म्‍हणाले की, जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक, संस्कृतीचे  जतन करणारे व ध्वनी प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा. 



अशा मंडळांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच या सण, उत्सवादरम्यान रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीटलाईट यासह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

        जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला म्हणाले की, गणेश मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पहाणी करण्यात येऊन त्या ठिकाणी असलेल्या समस्यांची सोडवणूक केली जाईल. एक खिडकी योजनेतून गणेशमंडळांना परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरून मिरवणुकीदरम्यान कुठलाही अडथळा अथवा अपघात होणार नाही.




  पोलीस प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, आवश्यक ठिकाणी बॅरीकेटींग करण्याबरोबरच पेट्रोलिंगही करण्यात येईल. उत्सवादरम्यान काही घटना घडल्यास त्याची माहिती देण्यासाठी डायल 112 चा वापर करावा. या उत्सवादरम्यान मंडळांनी त्यांचे स्वयंसेवक २४ उपलब्ध राहतील याची व्यवस्था करावी तसेच सण शांततेत साजरे होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

        यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे  सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.  बैठकीत शांतता समितीच्या  सदस्यांनी उपयुक्‍त अशा सुचना केल्‍या.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button