Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
क्राईमशिर्डी

52 लाखांचा मुद्देमाल गिळंकृत करणारा तत्कालीन पोलीस निरीक्षक-कुकर्मी तांबे ठरला काळाचा बळी

शिर्डी | साईदर्शन न्यूज
“सबका मालिक एक”चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पवित्र भूमीत जर कायद्याचा रखवालदारच चोर ठरला, तर न्याय मागायचा तरी कोणाकडे?
शिर्डी येथे तत्कालीन पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले नवलनाथ तांबे यांच्या कारकिर्दीत घडलेले प्रकरण हे फक्त आर्थिक गैरव्यवहार नाही, तर संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या विश्वासघाताचे जिवंत उदाहरण आहे.
त्याचे निधन झाले असले,
तरीही त्याच्या नावावर लागलेला 52 लाख रुपये रोख व लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तूंच्या अपहाराचा ठपका आजही न्यायालयाच्या दालनात प्रलंबित आहे.
🧾 तीन वर्षे चाललेली ‘संरक्षित’ लूट
शिर्डी येथे दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात.
याच गर्दीचा फायदा घेत पाकीटमार टोळ्या सक्रिय असतात.
➡️ श्री साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी
पाकीटमारांना पकडतात
➡️ त्यांच्याकडील रोकड, सोन्याच्या वस्तू, मोबाईल, पर्स, घड्याळे जप्त करतात
➡️ पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिर्डी पोलीस स्टेशनला सुपूर्त करतात
इथपर्यंत सर्व काही कायद्याप्रमाणे…
मात्र याच टप्प्यावर कायद्याची हत्या सुरू होते,
👉 नवलनाथ तांबे यांची कार्यपद्धती अशी होती —
पाकीटमाराला कोर्टात हजर करायचे
पण जप्त केलेला मुद्देमाल कोर्टात सादर करायचाच नाही
रेकॉर्डमध्ये आरोपी दिसतो,
पण त्याच्याजवळून सापडलेला मुद्देमाल हवेत विरतो
हा प्रकार एक-दोन दिवसांचा नव्हे,
तर सलग सुमारे तीन वर्षे सुरू होता.

sai nirman
जाहिरात

📑 माहिती अधिकाराने फोडलेले पोलिसी खोटेपण
दैनिक साईदर्शनने जेव्हा माहिती अधिकाराचा वापर केला,
तेव्हा प्रशासनाची झोप उडवणारी माहिती समोर आली.
📌 श्री साईबाबा संस्थानने लेखी माहिती दिली —
तब्बल ₹ 52,00,000 पेक्षा अधिक रोख रक्कम
सोन्याच्या वस्तू (आरटीआयमध्ये ‘पिवळा धातू’ असा उल्लेख)
मोबाईल फोन
पर्स, घड्याळे
इतर मौल्यवान साहित्य
👉 ही सर्व मालमत्ता शिर्डी पोलीस स्टेशनकडे सुपूर्त करण्यात आली होती.
📌 पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती —
पाकीटमार आरोपींची यादी
संस्थानच्या यादीशी तंतोतंत जुळणारी
मात्र — ❌ कोर्टात मुद्देमाल जमा केल्याचा पुरावा नाही
❌ रसीद नाही
❌ पंचनामा साखळी अपूर्ण
याचा अर्थ काय?
👉 आरोपी आहे
👉 गुन्हा आहे
👉 पण मुद्देमाल नाही!
⚖️ तक्रारी दडपल्या, पुरावे दुर्लक्षित
या प्रकरणात दैनिक साईदर्शनने स्वतः तक्रारदार म्हणून —
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे
संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे
लेखी पुरावे, आरटीआय कागदपत्रे जोडून
तक्रारी दाखल केल्या
पण परिणाम?
🚫 चौकशी नाही
🚫 निलंबन नाही
🚫 विभागीय कारवाई नाही
जणू 52 लाखांचा अपहार हा किरकोळ प्रकार असल्यासारखे मौन!
🏛️ उच्च न्यायालयात धडक
शेवटी प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळून
हे प्रकरण माननीय उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिकेद्वारे नेण्यात आले.
👉 आजही ही याचिका न्यायालयात प्रलंबित आहे
👉 सत्य बाहेर येण्याची प्रक्रिया कायद्याच्या हातात आहे
🕯️ सडून सडून मृत्यू झाला… पण प्रश्न संपले नाहीत
नवलनाथ तांबे याचे निधन झाले आहे.
पण —
चोरीचा मुद्देमाल परत मिळाला का? ❌
52 लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले का? ❌
जबाबदारी निश्चित झाली का? ❌
नाही!
मृत्यूने व्यक्ती थांबते,
पण गुन्ह्याचे प्रश्न मरत नाहीत.
🔥 साईबाबांच्या भूमीतील सर्वात मोठा विश्वासघात?
ज्या भूमीत
➡️ श्रद्धा विकली जात नाही
➡️ प्रामाणिकपणा पूजला जातो
त्याच भूमीत
पोलीस गणवेशात बसून भाविकांच्या अश्रूंवर डल्ला मारला गेला,
हा आरोप फक्त एका अधिकाऱ्यावर नाही,
तर संपूर्ण यंत्रणेवर आहे.
❓ साईबाबांच्या दरबारात एकच प्रश्न —
52 लाख कुठे गेले?
आणि सत्याला न्याय कधी मिळणार?

आणि बाबांच्या नगरीत जो असे कर्म करणार त्यास अशीच मौत मिळणार 

DN SPORTS

माणूस जन्माला आला तशीच त्याची मृत्यू अटळ असते परंतु सकर्म केल्याने चांगले मरण येते आणि कुकर्म करणारे सडून सडून मारतात त्याचे हे ताजे उदाहरण आहे कारण कि साईंची समाधी आजून जिवंत आहे 

kamlakar

………..: शिर्डीत गुन्हेगारी वाढवणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप
“गुन्हेगारांना पाठीशी घालून दहशत निर्माण केली” – विलासराव गोंदकर पाटील यांचा संताप
शिर्डी | साईदर्शन न्यूज
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत
कायद्याचे रक्षण करण्याऐवजी गुन्हेगारीला खतपाणी घालणारा पोलीस अधिकारी कार्यरत होता,
असा स्फोटक आरोप शिर्डीचे भूमिपुत्र विलासराव गोंदकर पाटील यांनी दैनिक साईदर्शनशी बोलताना केला आहे.
शिर्डी येथे तत्कालीन पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले नवलनाथ तांबे यांच्या कारकिर्दीबाबत बोलताना गोंदकर पाटील यांनी
“शिर्डीत गुंड टोळ्यांना पाठीशी घालून दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले”
असा गंभीर दावा केला आहे.
🩸 “त्याच्या सहकार्यामुळे निष्पाप दोन तरुणांचे जीव गेले” – थेट आरोप
विलासराव गोंदकर पाटील यांनी सांगितले की,
“पोलीस निरीक्षकाचे काम शहरात शांतता राखणे आणि गुन्हेगारी रोखणे असते.
पण या अधिकाऱ्याने खाकीचा गैरवापर करून गुंडगिरी केली आणि करवली.
त्याच्याच सहकार्यामुळे माझ्या व माझ्या मित्राच्या निष्पाप दोन मुलांचे जीव गेले.
हे आम्ही कधीच विसरणार नाही.”
या आरोपांमुळे तत्कालीन पोलीस प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नांकित झाली आहे.
⚖️ “सादरक्षणाय खलनिग्रणाय” फक्त फलकावरच?
पोलीस दलाचे ब्रीदवाक्य
“सादरक्षणाय खलनिग्रणाय”
म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन.
मात्र गोंदकर पाटील यांच्या मते,
“या पोलीस निरीक्षकाने या वाक्याचा अपमान केला.
खाकी घालून शिर्डीत गुंडगिरी केली गेली.
गुन्हेगार मोठे झाले, सामान्य नागरिक भयभीत झाले.”
🕯️ “कर्माचे फळ इथेच मिळते” – भावनिक प्रतिक्रिया
नवलनाथ तांबे यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना
विलासराव गोंदकर पाटील यांनी अत्यंत भावनिक शब्दांत म्हटले —
“माणूस कितीही मोठा असला,
पण कर्माचे फळ टळत नाही.
साईबाबांच्या नगरीत अन्याय टिकत नाही.
शेवटी बाबांचा दांडा फिरतोच,
हेच पुन्हा सिद्ध झाले.”
(ही प्रतिक्रिया वैयक्तिक भावना व मत स्वरूपात नोंदवली आहे.)
🔥 प्रश्न मात्र आजही जिवंत
तत्कालीन पोलीस निरीक्षकावर झालेले आरोप कधी तपासले गेले का?
गुंड टोळ्यांना संरक्षण दिल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का झाले?
निष्पाप तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
व्यक्ती गेली,
पण प्रश्न आजही शिर्डीच्या हवेत घोंगावत आहेत.
[12:36, 20/1/2026] ………..:

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button