Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

अयोध्या येथे श्रीराम मूर्तीप्राणप्रतिष्ठान होणार असून शिर्डीतही त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे संस्थांनने आयोजन करावे– कमलाकर कोते यांची मागणी

शिर्डी ( प्रतिनिधी) श्रीक्षेत्र अयोध्या येथे
दि.२२/०१/२०२४रोजी श्रीराम जन्म भुमी येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त श्रीसाईबाबा संस्थान
विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे वतीनेही शिर्डीत भव्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करणेत यावे. अशी मागणी शिंदे गटाचे शिवसेनेचे नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दि.२२ जानेवारी, २०२४ रोजी आपणा सर्वांना अनेक वर्षांपासुन प्रतिक्षा असलेली श्रीराम जन्म भुमी अयोध्या येथे श्रीरामांचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे. श्रीसाईबाबांचे आज्ञेने शिर्डी येथे त्यांचे काळापासुन श्रीरामनवमी या उत्सवाची सुरुवात झालेली आहे. त्याकरिता हा आपणा सर्वांना हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्या अनुषंगाने श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने व तर्फे श्रीसाईबाबांचे पावन भुमीमध्ये देखील अशाच पद्धतीने भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्याकरिता खालीलप्रमाणे कार्यक्रम आपणास करता येईल.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


श्रीरामनवमी उत्सवामध्ये श्रीसाईबाबांचे समाधी चौथ-यावर श्रीरामांची प्रतिमा ठेवण्यात येते. त्याच पद्धतीने दि.२२/०१/२०२४रोजी श्रीरामांची प्रतिमा (फोटो) ठेवण्यात यावा.
श्रींचे समाधी मंदिराचे परिसरामध्ये श्रीसाईबाबा व श्रीरामांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात यावी.
श्रींचे समाधी मंदिराचे कळस व अन्य सर्व मंदिरांना उत्सवाप्रमाणे लाईटींग व फुलांचे डेकोरेशन करण्यात यावे.
श्रींच्या समाधी मंदिर व परिसरामध्ये दिव्यांची आरास करण्यात यावी.
श्रीसाईप्रसादालय येथे सर्वांसाठी विशिष्ट प्रकारचे मिष्ठान्न प्रसाद देण्यात यावा.
श्रीसाईबाबा संस्थानमार्फत शताब्दी महोत्सवामध्ये रथाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पद्धतीने दि.२२/०१/२०२४रोजी भव्य रथ मिरवणूक काढण्यात यावी.
श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीमार्फत शताब्दी मंडप येथे सार्वजनिक श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठणाचा भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. त्याकरिता संस्थानमार्फत शिर्डी ग्रामस्थांना व साईभक्तांना आमंत्रीत करावे.
दि.२२/०१/२०४ रोजी पुर्ण दिवस श्री रामांची भजने सर्वत्र ध्वनिफीतीद्वारे प्रसारीत करण्यात यावी.
श्रींचे माध्यान्ह किंवा धूपारतीचे वेळी सोईप्रमाणे श्रींचे आरती बरोबर श्रीरामांची आरती गायली जावी.
तरी वरीलप्रमाणे भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन त्याबाबत स्वतंत्र पत्रिका तयार करुन ग्रामस्थ व साईभक्त यांना यामध्ये निमंत्रीत करण्यात यावे, अशी विनंती या पत्रकात शिवसेना शिंदे गटाचे नगर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button