Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी चे वतीने आज आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याशिवाय, कर्नाटक‍ येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एस.प्रकाश यांच्‍या देणगीतुन श्री समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
आषाढ शु ।।११ शके १९४७ आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साईबाबांनी त्यांचे भक्त दासगणू यांना विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते.

बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाई मंदिरात साजरा केला जात असे. परंपरेनुसार, हा उत्सव आजही साजरा केला जातो. दुपारच्या आरतीच्या वेळी, विठ्ठल भगवानांचा फोटो समाधी चौथऱ्यावर ठेवण्‍यात आला तर धूप आरतीच्या वेळी, श्री विठ्ठलची मराठी आरती गायली जाईल.


या दिवसाचे औचित्य साधून संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री 8 ते 9 या वेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्‍न होईल. रात्री 9:15 वाजता श्रींची पालखी शिर्डी गावातून मिरवणुकीत काढण्यात येणार असून पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल.


आषाढी एकादशीनिमित्त श्री साईप्रसादालयात आयोजित साबुदाणा खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे ४५ हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला. तर २१,६९० भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला.

यासाठी संस्थानने ६४ पोते साबुदाणा, ४२ पोते शेंगदाणे, ७०० किलो शेंगदाणा तेल आणि सुमारे २७०० किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button