Letest News
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा... तत्कालीन अकार्यक्षम पोलीस निरीक्षक दिनेश आहेरचा कारनामा सहा जिवंत काडतूस जमा करून एक काडतूस केला गाय... स्थानिक निवडणुकी साठी शिवसैनिकाणी सज्ज रहा अपहरणं करून डोक्याला बंदूक लावत पन्नास लाखाच्या चेकवर सही करून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे सुवर्णविजेते पदकचे माणकारी
क्राईमशिर्डी

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी वाढत चाललेले संबंध व पक्ष संघटनेत वाढलेले प्रभुत्व देखवत नसल्यामुळेच कमलाकर कोतेंवर खोटे आरोप

शिर्डी (प्रतिनिधी)   जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचे शिवसेना शिंदे गटात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध होत असल्याकारणाने व पक्षांमध्ये चांगले प्रभुत्व निर्माण झाल्यामुळे  पक्षातीलच काहीजणांना ते आवडत नसावे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

म्हणूनच असे असंतुष्ट काहीजण विनाकारण जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांना काहीतरी कारण दाखवून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शिर्डी शहरप्रमुख योगेश जगताप यांनी म्हटले आहे. शिवसेना शिंदे गटाची शिर्डी शासकीय विश्रामगृहात मीटिंगमध्ये किरकोळ वाद झाले.

त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने कमलाकर कोते यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या संदर्भात  शहरप्रमुख योगेश जगताप   यांनी सांगितले की, पक्षातीलच काही जणांना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचे  राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे ,

पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेना पक्षांमध्ये वाढत चाललेले प्रभुत्व हे त्यांच्या मनात खटकत आहे. पक्ष वाढीसाठी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचे  प्रयत्न सातत्याने सुरू आहे. मात्र पक्षातीलच काही या पक्ष संघटनेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याला शिर्डीसह काही पक्षाचे पदाधिकारीच पाठीमागून हातभार लावण्याचे काम करत आहेत.

त्यामुळेच जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांना  विनाकारण यातून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आपण अशा खोट्या आरोपांना भिक घालत नाही. असे शहरप्रमुख योगेश जगताप  यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button