Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
अ.नगरराजकीय

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील विळद येथिल नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन एप्रिल महिन्यात!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील विळद येथिल नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात उद्योग मंत्री ना. उदय सामंत व राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मुंबईत उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालय येथे सदर बैठकीचे आयोजन केले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदर बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार काशिनाथ दाते, महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व पारनेर तालुक्यातील प्रतिनिधी गणेश शेळके, सुजित झावरे, विजू आवटी, राहुल शिंदे, सचिन वरात आदी उपस्थित होते.


सदर बैठकीस नवीन नगर येथे होणाऱ्या विस्तारित एमआयडीसी भूमिपूजन संदर्भात तसेच सुपा एमआयडीसीतील उद्योजकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना त्रास होणार नाही, तसेच त्यांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये .

या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा झाली. तसेच उद्योजकांना वन विंडो सिस्टीमने काम करण्याच्या सुलभतेच्या दृष्टिकोनातून एमआयडीसीचे डेप्युटी सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये कामगार विभागाचे प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदूषण बोर्डचे प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती प्रत्येक उद्योजकांशी स्थानिक पातळीवर चर्चा करून त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी व सोडवणूक करून त्या ठिकाणी त्यांना योग्य ती मदत उद्योग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून करेल असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे,


अ,नगरमध्ये होणाऱ्या या एमआयडीसीमुळे उद्योगधंद्याला अधिक चालना मिळेल. अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच नगर जिल्ह्यातील मंजूर झालेल्या शिर्डी, श्रीगोंदा, नवीन नगर येथे अनेक उद्योगधंदे आणण्यासाठी तसेच जास्तीत जास्त रोजगार वाढवण्यासाठी उद्योग विभागाकडून प्रयत्न केले जातील अशी खात्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button