Letest News
महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीच्या शिवावर मास विक्रीवरून तणाव वादातून हातघाई-पोलिसांची तातडीची कारवाई कोपरगावच्या आगीचा इशारा-शिर्डीत गॅस हातगाड्यांचा वाढता धोका? पहाटेच्या काकड आरतीने महाशिवरात्री उत्सवाची मंगल सुरुवात-बेलपत्र अर्पण-शंकर प्रतिमा स्थापना-मंदिर पर... फिर्यादीच चौकशीच्या रडारवर? लेखापरीक्षकांवर ठेवीदारांचे गंभीर सवाल- संचालक-सहकार खाते की ऑडिट यंत्रण... आठ लाखांहून अधिक किमतीची भक्तीची भेट-साईभक्त धनराज मुंडे यांचे भावपूर्ण दान भक्ती-सेवा आणि समाधानाचा संगम!शिर्डी येथे ‘श्री साई परिक्रमा’ उत्साहात-भाविकांसाठी मोफत थंड पेय व पा... आर्थिक ताणात बार व्यवसाय-बाऊन्सर फंड्याला वेग परिसरात नव्या पद्धतीचा ट्रेंड उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीरराज्य शासनाकडून गुणवंत पत्रकारांचा सन्मान महापरिक्रमेचा जल्लोष… पण शहराच्या स्वागताच्या फलकांनी सौंदर्यावर प्रश्नचिन्ह शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश
राजकीयशिर्डी

पहाटेच्या काकड आरतीने महाशिवरात्री उत्सवाची मंगल सुरुवात-बेलपत्र अर्पण-शंकर प्रतिमा स्थापना-मंदिर परिसर भक्तांनी फुलला

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न होताच मंदिर परिसरात भक्तिरसाची मंगलमय सुरुवात झाली.

sai nirman
जाहिरात
🌅

DN SPORTS

kamlakar

पहाटेची काकड आरती ते मंगलस्नान
सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान पार पडले. त्यानंतर “शिर्डी माझे पंढरपूर” ही आरती सादर करण्यात आली. यावेळी समाधी चौथऱ्यावर भगवान शंकरांचा फोटो ठेवण्यात आला. श्री साईबाबांच्या मूर्ती व समाधीवर बेलपत्राचा हार अर्पण करून विशेष पूजन करण्यात आले. सकाळी ०६.२५ वाजता भाविकांसाठी दर्शनास प्रारंभ झाला.

🌼

मंदिर परिसर भक्तांनी फुलला
महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली असून मंदिर व परिसर भक्तांनी फुलून गेला आहे. दुपारी १२.०० वाजता श्रींची माध्यान्ह आरती

पालखी मिरवणूक आणि रुद्राभिषेक
सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होणार असून रात्रौ ०९.१५ वाजता श्रींची पालखी गावातून मिरवणुकीस निघेल. गावातील प्रमुख मार्गांवरून ही पालखी मिरवणूक पार पडणार आहे. पालखी परत समाधी मंदिरात आल्यानंतर शेजारती होईल. तसेच रात्रौ १२.२८ ते ०१.१८ या वेळेत गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा आयोजित करण्यात आली आहे.

🍲

साईप्रसादालयात भव्य नियोजन
महाशिवरात्रीनिमित्त साईप्रसादालयात सुमारे ६० ते ६५ हजार साईभक्तांना मोफत प्रसादरूपी साबुदाणा खिचडीचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५५ पोती साबुदाणा, ४००० किलो शेंगदाणे, ७०० किलो शेंगदाणा तेल आणि २००० किलो बटाट्याचा वापर होणार आहे. आज सकाळीच अंदाजे २७,५०५ नाश्ता पाकिटांचे वितरण करण्यात आले.

🙏

भक्ती, सेवा आणि सुव्यवस्थेचा संगम
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिर्डीत भक्ती, सेवा आणि सुव्यवस्थेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. संस्थान प्रशासन, सुरक्षा यंत्रणा व स्वयंसेवक यांच्या नियोजनामुळे उत्सव सुरळीतपणे पार पडत असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button