शिर्डी परिसरातील आराध्य दैवत — श्री राजा विरभद्र (बिरोबा) मंदिर यात्रा सोहळा २०२५ 🌿
शिर्डी │ प्रतिनिधी

शिर्डीपासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य, प्रसन्न वातावरणात वसलेले बिरोबा बन हे परिसरातील श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाते. बिरोबा म्हणजेच श्री राजा विरभद्र, सायन्स युगातील एक अद्भुत चमत्कार आणि दैवी शक्तीचा स्वयंभू साक्षात्कार मानला जातो. भक्तनगरी शिर्डीच्या भूमीवर हे स्थान जणू भक्तीचा आणि पराक्रमाचा संगमच आहे.
🌺 श्री राजा विरभद्र महाराजांच्या भव्य यात्रेला प्रारंभ
दरवर्षीप्रमाणे यंदाही बिरोबा बन येथे श्री राजा विरभद्र महाराजांची यात्रा मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ ते गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या यात्रेला शिर्डी पंचक्रोशीसह राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा अनोखा संगम या तीन दिवसांच्या सोहळ्यात अनुभवायला मिळतो.
📅 भव्य कार्यक्रमांची रूपरेषा
मंगळवार, दि. ०४/११/२०२५
🔹 सकाळी ५ वा. — श्रींची पूजा, अभ्यंगस्नान
🔹 सकाळी ५ ते ६ वा. — गंगेच्या पाण्याची कावडी मिरवणूक
🔹 सकाळी ७ ते सायं. ५ वा. — श्री विरभद्र महाराजांच्या रथ व काठीची भव्य मिरवणूक
🔹 सायं. ६:३० ते ८:३० — भक्तांसाठी महाप्रसाद
🔹 रात्री ८ ते ९:४५ — डफांचा खेळ
🔹 रात्री १० वा. — तरोडाचा कार्यक्रम
🔹 रात्री १०:१५ पासून — श्रींच्या व्हईका व करमणुकीचा जागरण कार्यक्रम
बुधवार, दि. ०५/११/२०२५
🔹 सकाळी ९ ते सायं. ७ — श्रींच्या गणाचा भव्य कार्यक्रम
🔹 सकाळी १० वा. — ह.भ.प. श्री इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन
🔹 सायं. ७ वा. — शिवचरित्र कार्यक्रम
गुरुवार, दि. ०६/११/२०२५
🔹 दुपारी २ ते ६ — भव्य जंगी कुस्ती हंगामा
(श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे सहकार्याने)
🔹 सायं. ६ ते ९ — भंडारा (महाप्रसाद) व यात्रेची सांगता
🔹 रात्री ८ ते १० — भारुडाचा कार्यक्रम
🙏 भाविकांसाठी नम्र आवाहन
शिर्डी व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या दैवी यात्रेचा लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती विरभद्र दल व विरभद्र भक्त मंडळ, बिरोबा बन, शिर्डी यांच्याकडून करण्यात आली आहे.
📍 स्थळ: बिरोबा बन, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
भक्तिभाव, निसर्गसौंदर्य आणि लोकपरंपरेचा संगम असलेली ही बिरोबा बन यात्रा प्रत्येक भक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. 🌼
