संगमनेर – राज्यात नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच प्रशासन अलर्ट मोडमध्ये आलेले असतानाच संगमनेरमध्ये धडकी भरवणारी घटना उघडकीस आली आहे. शहराजवळील परिसरात उभ्या असलेल्या एका संशयित गाडीतून तब्बल १ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

गाडीबाबत संशय आल्याने निवडणूक उडाण पथक व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. तपासादरम्यान गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गठ्ठ्यांनी बांधलेली रोकड आढळताच पथकाने रक्कम जागेवरच ताब्यात घेतली.
🔍 ही रक्कम कोणाची? कशासाठी?
या पैसे कुठून आले, कोणाकडे जाणार होते, आणि नेमका यांचा निवडणुकीशी काही संबंध आहे का… याचा सखोल तपास निवडणूक अधिकारी व पोलिसांकडून सुरू आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाने संपूर्ण प्रकरणावर पडदा पडू नये म्हणून अत्यंत गोपनीयतेने पुढील तपास सुरू केला आहे.
आचारसंहितेच्या काळात प्रशासन ‘झिरो टॉलरन्स’वर
राज्यात निवडणुका लागताच अवैध पैसे, दारू, भेटवस्तू यांच्या वाहतुकीवर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. संगमनेरमध्ये सापडलेल्या या प्रचंड रकमेने काही राजकीय गटांचे धाबे दणाणले असून, शहरात राजकीय चर्चांना वेग आला आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की—
“निवडणूक काळात कुठलाही अवैध पैसा फिरू दिला जाणार नाही. कुणीही नियम मोडला तर थेट गुन्हे दाखल केले जातील.”
संगमनेरकरांमध्ये चर्चा तीव्र
या कारवाईने सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. “अचानक एक कोटी रुपये कुठे जात होते?” आणि “यामागे कोणते मोठे हात असू शकतात?” हे प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
