शिर्डी (प्रतिनिधी )अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे ,गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे . जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे .मात्र त्याकडे जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा आणि सुव्यवस्थेकडे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी व राज्याच्या गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील महिलेवर ऍसिड हल्ला झाला मात्र आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे येथील महिला घाबरलेल्या आरोपी मोकळे असल्यामुळे येथे घबराट निर्माण झालेली आहे. आरोपी सापडत नसल्यामुळे त्यांचे व इतर आरोपींचे मनोबल वाढू शकते.
या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळेवर ठेचण्याचे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फत्याबाद येथे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी दरोडाचा प्रयत्न झाला.
मात्र मा. सरपंच बाबासाहेब आठरे यांच्या सून हर्षदा आठरे ह्या जाग्या झाल्या व त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे दरोडेखोर हे सोन्याचे दागिने असलेले गाठोडे खाली टाकून उड्या मारून पळून गेले. मात्र त्यांनी हर्षदा आठरे यांचा त्यामुळे काटा धरला व त्यांनी दुसऱ्याच दिवशी हर्षदा अठरा या आपल्या मुलीला दवाखान्यातून घेऊन येत असताना त्यांच्यावर ऍसिड फेकून हल्ला केला व त्यांना जखमी केले. आदल्या दिवशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.
हर्षदा अठरा यांच्यामुळे दरोडा असफल झाला .त्याचा राग धरून दुसऱ्या दिवशीच हर्षदा आठरे यांच्यावर ऍसिड हल्ला केला. त्यांना लोणी येथील पीएमटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र या गोष्टीला 15 दिवस उलटून गेले असले तरीही आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे फत्याबाद मधील नागरिक विशेषता महिला घाबरलेल्या अवस्थेत आहेत. घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यामुळे गृहमंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे त्वरित लक्ष देऊन आरोपींना अटक करावी.
पोलिसांनी आठ दिवसाच्या आत तपास न लावल्यास व आरोपींना अटक न केल्यास लोणी पोलीस चौकी समोरच आमरण उपोषण करण्याचा इशारा फत्याबाद गावचे माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांनी दिला आहे.