
शिर्डी प्रतिनिधी / शिर्डी शहरात सार्वजनिक ठिकाणी धुंकणाऱ्यावर नगरपरिषद शिर्डी मार्फत दंडात्मक कारवाई केली जाते, त्यासाठी कंत्राटी तत्वावर महिलांना नेमण्यात आलेले आहे. श्री साई बाबा मंदिर गेट नं.4 समोर थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे वेळी इसम नामे महेश गोरख बोराडे हा नेहमी कारवाई करणाऱ्या पथकाशी वाद व हुज्जत घालतो त्यास समजावूनही त्याचे वर्तनात सुधारणा झालेली नाही.

थुकणाऱ्या विरुध्द कारवाई करणाऱ्या महिला ह्या गेट नं.४ समोर असताना व कारवाई करीत असताना महेश गोरख बोराडे रा. शिर्डी या इसमाने सदर महिलांना अश्लिल शिवीगाळ करून दमबाजी केली, त्याबाबत सदर महिलांनी मला कळविलेनंतर मी अतिक्रमण पथकातील नविन शेजवळ, अशांना सदर ठिकाणी पाठविले, सदर इसम त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना देखील सदर इसम महेश गोरख बोराडे रा. शिर्डी
याने अश्लिल शिवीगाळ करून दमबाजी केली व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला हि मुख्याधिकारी सतिश दिघे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी सागर अशोक गायकवाड वरिष्ठ लिपिक शिर्डी नगरपरिषद रा शिर्डी पोलीस स्टेशनला आज रोजी येवून महेश बोराडे विरोधात अश्लिल शिविगाळ दमबाजी सरकारी कामात अडथळा केला
म्हणून कायदेशीर फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २९६/२२१/३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून डि वाय एस पी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंणजीत गलांडे हे तपास करीत आहे