Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

संस्थान मध्ये चोरी प्रकरणातील बाणा गोंदकर यांना न्यायालयीन कोठडी 

शिर्डी –(प्रतिनिधी) शिर्डी साईबाबांच्या मंदिरात दानरूपी आलेल्या पैश्यांची मोजणी करतांना तब्बल दीड लाख रुपये चोरी करतांना  बाणा गोंदकर यांचा सध्या कोठडीत मुक्काम आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या मुक्कामात त्यांनी  अनेक हस्तकांची कबुली दिली असून पहिला मासा लेखा शाखेतील कंत्राटी कर्मचारी साळवे हा सापडला आहे.आणि दुसरे नाव खराडे यांचे चर्चिले जात आहे 
साईबाबांच्या दरबारामध्ये जो कोणी चोरी करेल त्याला साईबाबा सोडत नाही तो कितीही मोठा हे ह्या कारवाईतून स्पष्ट झालेले आहे 


 कोपरगाव येथील कंत्राटी कर्मचारी साळवे हा चोरी मधे मदत करत होता .बाना गोंदकर यांनी साळवे  चे नाव घेतले असता त्याचे कडून उलट तपासणी करत  पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतले असून तोही कदाचित कस्टडीत येईल असे बोलले जात आहे आणि खराडे यांचेही नावाची चर्चा संस्थान परिसरात आहे


बाणा गोंदकर यांना अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर  असता कोर्टाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली होती ती आज संपली आज बाणा गोंदकर यांना पुन्हा  कोर्टात हजर  केले असता  कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली  आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली आहे

 
साईबाबांच्या मंदिरात चोरी झाल्याने ह्या प्रकरणाकडे  प्रत्येक माणसाची नजर चोरी प्रकरणातील तपासाकडे लागली आहे .
पोलिसांनी चांगल्या पद्धतीने तपास केल्यास यात अनेक रॅकेट सापडणार आहेत आतापर्यंत फक्त साळवे याचे नाव  पुढे आल्याचे पोलीस गोंदकर यांच्या कस्टडीत निष्पन्न झाले आहे .

पुन्हा खराडे यांची चर्चा सुरु झालेली आहे यात आजून अनेक मोठे बोके अडकलेले असून ते पटलावर होणे गरजेचे आहे .पोलिसांनी इमानदारीने जर चौकशी केली संबंधित चोरांना कडक शिक्षा झाल्यास पुन्हा बाबांच्या झोळीत हात घालण्याची कोणीही धाडस करणार नाही  त्यामुळे पोलिसांनी आपली स्वच्छ प्रतिमा जपायची असल्यास तपास निपक्ष व्हावा चोराला साथ देऊ नये. अशी नागरिकांची धारणा आहे


ह्या प्रकरणी संस्थानाने मोठे धाडस दाखवून गुन्हा दाखल केल्याने एक प्रकारे चपराक दिली असल्याचे बोलले जात आहे संस्थानाने हि यात आजून कोणी चोरीत सहभागी असतील तर त्यावरही अश्याच पद्धतीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 



जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button