Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
Blog

रस्त्याला आडवे होऊन चाकूचा धाक दाखवत मोबाइलसह पैशे पडवणारे भामट्यांना तालुका पोलिस स्टेशनने केले जेरबंद

राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर, अपर पोलीस
अधिक्षक श्रीरामपूर संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग, यांनी दिलेले आदेश व
सुचनांनुसार पोलीस स्टेशन हददीतील उघडकीस न आलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याची मोहीम हाती घेण्यात
आलेली असुन त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गुन्हे
उघडकीस आणनेकरीता स्वतंत्र तपास पथक नियुक्त केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दिनांक 25/04/2023 रोजी रात्री 8:30 वा दरम्यान पुणतांबा फाटा ते झगडे फाटा जाणारे रोडवर झगडे
फाटा ता. कोपरगाव येथे डॉ. तुषार बाळासाहेब खंडीझोड वय 24वर्षे रा. सोनेवाडी ता. कोपरगांव हे त्यांचे मोटार
सायकलवर हायवेने घरी जात असताना चांदेकसारे शिवारात पल्सर मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात
इसमांनी फिर्यादीची मोटार सायकल अडवुन त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे जवळील मोबाईल. रोख रक्कम
डेबीट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स असा एकुण 20,900 रुपयांचा मुददेमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. याबाबत
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.324/2023 भा.द.वि.क.392.341.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल हॅण्डसेटचे तांत्रीक विश्लेषण करुन, गोपनीय बातमीदाराचे
मार्फतीने गुन्हयाचा सखोल तपास करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे अमोल राजेंद्र काकळीज
वय 25वर्षे रा मालेगाव कॅम्प ता. मालेगावे जि. नाशिक याचा सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यास
पोलीस पथकाने मालेगाव जि. नाशिक येथुन ताब्यात घेतले व सदर गुन्हयात अटक करुन त्यास मुदतीत मा.
न्यायालयासमोर हजर करुन त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली.

पोलीस कोठडी रिमांडमध्ये आरोपीने
पोलीसांकडे गुन्हयाची कबुली दिली असुन, नमुद गुन्हयात चोरुन नेलेल्या 20900 रुपयांच्या मुद्देमालापैकी
20,000 रुपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट त्याने काढुन दिल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हा
करतेवेळी त्याचे सोबत असलेल्या आरोपीचे नांव त्याने सांगीतले असुन, सदर आरोपी हा सध्या इतर पोलीस
स्टेशनकडील गुन्हयामध्ये अटक असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध हा
पोलीसांनी फिर्यादीचे चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेशनाचे आधारे व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने
अत्यंत कुशलतेने करुन जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आ

kamlakar


सदरची कौतुकास्पद कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती
भोर , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक
फौजदार सुरेश गागरे, पोकॉ. रशिद शेख, पोकॉ अनिस शेख पो.कॉ. रोहित आरवडे, पोकॉ अमोल फटांगरे,
चालक पो.ना. साळुंके, पो.कॉ. मेढे व पो.कॉ.आकाश बहिरट, सायबर सेल श्रीरामपूर यांचे पथकाने केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button