Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

shirdi news:-श्री साईबाबा संस्थान व श्री महावीर विकलांग सहायता समिती तर्फे मोफत जयपूर फूट शिबिराचे आयोजन

Free Jaipur Foot Camp organized by Shri Saibaba Sansthan and Shri Mahaveer Ambandik Sahayat SamitiFree Jaipur Foot Camp organized by Shri Saibaba Sansthan and Shri Mahaveer Ambandik Sahayat Samiti

शिर्डी
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे संयुक्‍त विद्यमाने ०५ वर्षानंतर पुन्‍हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीराचे आयोजन केले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दिनांक दि.२६/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४ या दरम्‍यान श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्‍यांगासाठी साहित्‍य वाटपाचे आयोजन करणेत आले असून यामध्‍ये गरजु व लाभार्थी दिव्‍यांग व्‍यक्‍तींची तपासणी करणेत येऊन आवश्‍यकतेनुसार दिव्‍यांग व्‍यक्‍तीच्‍या पायाचे माप घेऊन त्‍या मापाचे कृत्रीम पाय रोपण करण्‍यात येणार आहे.

नवीन पाय बसविणे बरोबर जुन्‍या कृत्रीम पायाची दुरुस्‍ती देखील सदर शिबीरामध्‍ये मोफत करण्‍यात येईल. याचबरोबर दिव्‍यांगाकरीता आवश्‍यक साहित्‍याचे वाटप देखील शिबीर कालावधीत करण्‍यात येणार आहे. सदर शिबीरात येणा-या सर्व शिबीरार्थींना श्री साईबाबा संस्‍थान मार्फत राहण्‍याची व दोन वेळच्‍या जेवणाची मोफत व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

या शिबीरात भाग घेणेसाठी श्री साईनाथ रुग्‍णालय, शिर्डी येथे नाव नोंदणी सुरु असून दुरध्‍वनी क्र. ०२४२३-२५८५५५ वर संपर्क साधुनही नावनोंदणी करता येईल तसेच शिबीरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्‍य ओळखपत्र आणि ०२ पासपोर्ट साईज फोटो घेवुन यावे.


तरी जास्‍तीत जास्‍त दिव्‍यांग गरजू व्‍यक्‍तींनी या शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे संस्‍थापक पदमभुषण डी.आर.मेहता यांनी केलेले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button