Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरक्राईम

५१ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगतस्थानिक गुन्हे शाखेने ५७२.७५ ग्रॅम सोनं जप्त करून फिर्यादीस दिला न्यायाचा दिलासा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहिल्यानगर शहरातील सराफ व्यावसायिकास लुबाडून पसार झालेल्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल राज्यात जाऊन मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ₹५१,१३,७९५ किंमतीचे ५७२.७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

sai nirman
जाहिरात

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रोड) हे होलसेल सोन्याच्या विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दुकानात काम करणारे इसम दिपनकर माजी, सोमीन बेरा, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेग आणि स्नेहा बेरा यांनी विश्वास संपादन करून, फिर्यादींच्या संमतीशिवाय ₹१ कोटी १ लाख ५ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९८७/२०२५ बीएनएस कलम ३१६(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तपासासाठी पो.उ.नि. संदीप मुरकुटे यांच्या समवेत शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, सतीश भवर, प्रशांत राठोड आदींचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले.

DN SPORTS

पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी करून आरोपी हे अमरागरी, जि. हावरा, पश्चिम बंगाल येथे असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर पोलिसांनी पश्चिम बंगाल गाठून आरोपी (१) सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक (वय ३३), (२) दिपनकर आरुण माजी (वय २२), (३) अनिमेश मनोरंजन दोलुई (वय २५), (४) सोमनाथ जगन्नाथ सामंता (वय ३०) यांना अटक केली. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या चौकशीत आरोपींकडून ₹५१,१३,७९५ किंमतीचे ५७२.७५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. उर्वरित आरोपी संतु बेरा आणि स्नेहा बेरा यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

सदरची कारवाई अहिल्यानगर पोलिसांची व्यावसायिक कौशल्यपूर्ण व तत्पर तपासात्मक कामगिरी मानली जात असून, या यशस्वी ऑपरेशनचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केले आहे.
पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

🟡 स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे सोनार व्यावसायिकास मिळाला मोठा दिलासा!

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button