Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
Blog

शिर्डीतील जुना पिंपळवाडी रस्ता नवीन दर्शन रांग झाल्यामुळे आता होत आहे खुला!

शिर्डी ( प्रतिनिधी)गेल्या १९ वर्षापासून साईभक्तांना अडचण येऊ नये .यासाठी शिर्डी नगर परिषदेने शिर्डी येथील महत्वाचा रहदारीचा  पिंपळवाडी रस्ता हा श्री साईबाबा संस्थानला सहकार्य करत वापरास दिला होता.माञ आता साईभक्तांसाठी दर्शन रांग सुरु झाल्याने हा रस्ता आता खुला करावा. अशी मागणी ग्रामस्थांकडुन केली जात होती.आणि त्याच अनुशंगाने आता हा रस्ता खुला करण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन साई संस्थान ,न.पा.मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या आदेशाने हा रस्ता खुला करण्याचे काम होत आहे.यामुळे आता पिंपळवाडी रस्त्यावरील ग्रामस्थ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिर्डी नगरपंचायतचे  माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर , नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


हा रस्ता खुला करण्याचे काम सुरु झाल्याने , माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर  , सचिन शिंदे , माजी नगरसेवक अशोक गोंदकर , बाबासाहेब कोते , प्रतीक शेळके , हरीश थोरात , जैन फुटरमल , प्रवीण गोंदकर आदींनी पिंपळवाडी रस्ता खुला करताना पाहणी केली.व समाधान व्यक्त केले. हा रस्ता साई संस्थांनला देण्यात आला होता. तेथे पूर्वी दर्शन रांग होती. त्यामुळे येथील वाहतूक रहदारी बंद होती. त्याचा फटका येथील व्यवसायिकांना बसला होता. मात्र आता हा रस्ता खुला होत असल्यामुळे  या परिसरातील व्यवसायिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. साई भक्तांनाही येथे जाण्यासाठी येण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग होईल. असे आता नागरिकांतून बोलले जात आहे. व साईसंस्थान आणि नगरपरिषदेला धन्यवाद देण्यात येत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button