Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
क्राईमशिर्डी

शिर्डीत भंगारातून आणलेल्या कुठलेही कागदपत्रे नसलेल्या बोगस अँपे रिक्षा रस्त्यावर करीत आहेत वाहतूक

शिर्डी प्रतिनिधी /

sai nirman
जाहिरात

काही दिवसापूर्वी श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कडक कारवाई सुरू करण्यात आली होती  मात्र कारवाईचा जोर ओसरताच शिर्डीसह राहता तालुक्यात  तीन चाकी अप्पे व रिक्षा वाहन चालक हे भंगारातील  पंधरा वर्षे जुनी असलेली  वेगवेगळ्या जिल्ह्यातील पासिंग असलेली  स्क्रॅप  वाहने आणून पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे रस्त्यावर

DN SPORTS

kamlakar

चालवत असून काही महाभागांनी एक लाईटच्या जागेवर जास्त प्रकाश पडणारी दोन लाईट लावलेली असून काहींनी काचेवरच वेगवेगळ्या संघटनेची नावे तर काहींनी प्रेसचे फोटो लावलेले आहे  काही दिवसापूर्वी पोहेगाव शिवारात झालेल्या अपघातात  पाच जणांना जीव गमवावा लागला होता

त्याचा विसर परिवहन विभागाला पडलेला दिसून येतो  शिर्डीत शासनाने पंधरा वर्ष नंतर ज्या गाड्या रस्त्यावर चालवल्या नाही पाहिजेत त्या गाड्या राजरोसपने शिर्डीत चालत आहेत असे शिर्डी पोलिस वाहतूक शाखेकडून  माहिती अधिकारात  विविध माहिती मिळाली आहे.हेच रिक्षा चालक भरदिवसा मद्यपान करून भररस्त्यात कुठेही आपली वाहने उभी करतात

त्याचा साईभक्तांना मोठा त्रास होतो आहे,यातील अनेक चालकांकडे बॅच  व लायसन्स देखील नाहीत, काही वाहनांचे कागदपत्रेच नाहीत, तरीही ही वाहने रस्त्यावर चालत आहे, शिर्डी वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर यांच्या आशीर्वादाने  अनाधिकृत  जुनाट प्रदूषण वाढवणारे  विना परमिट  रिक्षा / अपे वाहने चालत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे

म्हणून ह्या वाहनांकडे जातीने लक्ष घालून  ज्याच्याकडे  कागदपत्रे नाहीत लायसन्स नाहीत अशा वाहनावर  कठोर कारवाई करून सदरील वाहने जप्त (जमा) करून घेण्यासाठी पावले उचलुन कारवाई करावी अशी मागणी दैनिक साईदर्शनने अर्जाद्वारे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, शिरसगांव ता. श्रीरामपूर  यांच्याकडे    पत्रकाद्वारे केली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button