Letest News
रस्त्यावर गुटखा थुंकणाऱ्या तरुणावर कारवाई सर्जेराव कोते पाटील यांच्या जागरूकतेमुळे नगरपालिकेची तातडी... साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख...
क्राईमशिर्डी

अनुयायांच्या नावावर बनावट खाती-‘समता पतसंस्था’चा महाघोटाळा उघडकीस? “समता”ला संरक्षण कोण देतंय?

शिर्डी : अनुयायांच्या नावावर बनावट खाती उघडून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत असताना समता पतसंस्था थेट वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. या प्रकरणाने ‘भोंदू खरात’ नेटवर्कचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिर्डीत संतापाची लाट उसळली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – गुन्हा दाखल होऊनही संबंधित व्यवस्थापकावर अजून अटकेची कारवाई नाही! त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “ही विलंबाची ढाल कोणासाठी?” असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासादरम्यान ४५ खातेदारांची चौकशी करण्यात आली असून, अनेकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “आम्ही कोणतेही खाते उघडलेले नाही.” या जबाबांमुळे बनावट कागदपत्रे, खोटे स्वाक्षऱ्या आणि आर्थिक व्यवहारांचा मोठा घोटाळा उघड होत असल्याची शक्यता बळावली आहे.
या प्रकरणात केवळ कर्मचारीच नव्हे तर वरच्या स्तरावरील जबाबदारांपर्यंत तपास नेण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्यावरही थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता तीव्र झाली आहे.
दरम्यान, ‘भोंदू खरात’ प्रकरणाशी या घोटाळ्याचे संबंध असल्याच्या चर्चेमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आर्थिक गैरव्यवहार, बनावट खाती आणि संभाव्य मनी ट्रेल यामुळे संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


📢 संतप्त नागरिकांचे थेट प्रश्न:
👉 ४५ लोकांच्या नावावर खाती उघडलीच कशी?
👉 खातेदारांना न कळता व्यवहार कोणी केले?
👉 गुन्हा दाखल असूनही अटक का नाही?
👉 “समता”ला संरक्षण कोण देतंय?
⚠️ इशारा स्पष्ट:
जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर हे प्रकरण केवळ आर्थिक घोटाळा न राहता जनआंदोलनात रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
👉 जनतेची मागणी एकच – “मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button