Letest News
समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का?
अ.नगरराजकीय

शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीची भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांनी आर.जी.एस. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सहकारी कर्मचाऱ्यांसह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात नातेपुते येथे हजारो वारकऱ्यांना निस्वार्थ वैद्यकीय सेवा देत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
पालखी सोहळ्यातील मोठ्या गर्दीत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विविध आजारांवर उपचार, प्राथमिक उपचार, औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करून संपूर्ण वैद्यकीय पथकाने अत्यंत समर्पित भावनेने सेवा बजावली. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सेवाभावी कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिर्डी शहर यांच्या वतीने डॉ. सिमरन साई कोतकर व आर.जी.एस. हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी सामाजिक व वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
डॉ. सिमरन कोतकर या शिर्डीच्या भूमिपुत्री असून त्यांनी आपल्या कार्यातून शिर्डीच्या सेवाभावी परंपरेला साजेसा आदर्श घालून दिला आहे. “सेवाच खरा धर्म… मानवसेवाच ईश्वरसेवा!” हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button