Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
क्राईमशिर्डी

24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न जुमानता घणाघात

दोषी डॉक्टर पटेल सस्पेंड – कर्तव्यदक्ष कार्यकारी गोरक्ष गाडिलकर यांची ठोस कारवाई
शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानच्या पवित्र नावाने चालणारे आणि पूर्णतः मोफत उपचार देणारे २०० रूम येथील साईनाथ हॉस्पिटल हे गरीब, गरजू रुग्णांसाठी वरदान आहे. मात्र या पवित्र व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या लाचखोर डॉक्टर पटेल यांचा घृणास्पद कारभार उघडकीस आल्यानंतर, संस्थानचे कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी तात्काळ आणि ठोस कारवाई करत संबंधित डॉक्टरला निलंबित (Suspend) केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अर्ज दिला – आश्वासन दिलं – आणि प्रत्यक्ष कारवाई करून दाखवली
या प्रकरणात राहाता येथील कु. माहेश्वरी प्रकाश सूर्यवंशी यांनी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला होता.
तक्रार स्वीकारताना कार्यकारी अधिकारी साहेबांनी,
“मी याची गंभीर दखल घेतो आणि दोषींवर कारवाई करतो”
असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
आज त्यांनी ते शब्द प्रत्यक्ष अवघ्या २४ तासात कृतीत उतरवून दाखवले आहेत.


प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या डॉक्टर पटेल यांना सस्पेंड करून
संस्थान कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
ही कारवाई म्हणजे केवळ निलंबन नाही, तर
न्यायावरचा विश्वास
साईबाबांच्या नावाची शुद्धता
प्रशासनाची कणखरता
यांचा विजय आहे.

हॉस्पिटल मोफत – पण डॉक्टरने खाजगी लूट सुरू केली
तक्रारीनुसार, रुग्णांना “सर्व उपचार मोफत” असल्याचे सांगून दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर पटेल आणि डॉक्टर सहाणे यांनी संगनमताने—
ऑपरेशनसाठी दीड ते दोन लाखांचा खर्च सांगणे
“₹३४,००० दिले तर उर्वरित मॅनेज करतो” अशी भाषा वापरणे
हॉस्पिटलच्या पावतीशिवाय, वैयक्तिकरित्या पैसे उकळणे
असा प्रकार केल्याचा आरोप आहे.


यातून स्पष्ट होते की—
साईनाथ हॉस्पिटल मोफतच होते
फसवणूक ही डॉक्टरच्या वैयक्तिक लालसेमुळे झाली
तक्रार केल्यावर दबाव व धमकी – पण प्रशासन डगमगले नाही
तक्रार मागे घ्यावी म्हणून
“सगळं मॅनेज करतो, पैसे परत देतो”
अशी भाषा वापरून दबाव टाकल्याचा आरोपही समोर आला.
पण या वेळी
धमकी चालली नाही
दबाव चालला नाही
कायदा आणि कर्तव्य जिंकलं

डॉक्टर पटेल यांना निलंबित करून संस्थानने स्पष्ट संदेश दिला आहे की—
साईबाबांच्या नावाखाली लूट खपवून घेतली जाणार नाही
गरीब रुग्णांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना अभय नाही
दोषी आढळल्यास पुढे
   सेवा समाप्ती
   फौजदारी गुन्हे
   कायदेशीर कारवाई
अटळ आहे


कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी – विश्वासाला न्याय
आज लाखो साईभक्तांचा विश्वास
हॉस्पिटलवर आहे
साईबाबांच्या सेवाभावावर आहे
आणि असा न्याय देणाऱ्या प्रशासनावर आहे


अखेर लाचखोर डॉक्टर पटेल यांना सस्पेंड करून
कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर साहेबांनी साईबाबांच्या नावाचा सन्मान राखला
गरिबांना न्याय दिला
भ्रष्ट प्रवृत्तीला चाप लावला
ही कारवाई म्हणजे केवळ प्रशासकीय निर्णय नाही,
तर साईभक्तांच्या भावनांचा विजय आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button