Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरक्राईम

कोपरगावात सत्तेचा गर्व कोसळला का? आमदारांच्या पी.ए.चा तुरुंगवास — सत्तेचा अहंकार की लोकशाहीचा विजय

कोपरगाव प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

कोपरगाव तालुक्यात सत्ता, अहंकार आणि गुन्हेगारी यांचा संगम झाल्याचं चित्र आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे. आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी अखेर पोलिसांच्या ताब्यात लागले असून, थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले आहेत.
हा शेवट नसून — राजकीय गर्वाच्या पतनाची ही सुरुवात असल्याचं लोकांमध्ये चर्चेचं वादळ उठलं आहे.

दगडफेक प्रकरणानंतर तुरुंगवासी

DN SPORTS

२६ ऑक्टोबर रोजी अरुण जोशी पोलिसांच्या ताब्यात आला. नवरात्रीच्या उत्सवात झालेल्या दगडफेकीत तसेच पोलिसांवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं.
पूर्वीही ‘होळीबारा’सारख्या प्रकरणात त्याचा सहभाग चर्चेत होता. मात्र प्रत्येकवेळी काही अदृश्य शक्तींनी त्याला वाचवलं, अशी लोकांमध्ये ठाम धारणा होती.
यावेळी मात्र ती राजकीय कवचं तडकली — आणि कोपरगावातील सत्तेच्या बुर्जावरची पहिली थेट पडझड म्हणून या घटनेकडे पाहिलं जातंय.

जनतेत संताप, कायदा सर्वांसाठी समान

जनतेच्या आशीर्वादावर उभं राहून सत्ता मिळवणाऱ्यांनी जर स्वतःभोवती गुंड आणि कायदा मोडणारे ठेवले, तर ती लोकशाहीचा अपमान आहे, असा सूर जनतेत आहे.
सत्ता म्हणजे विकासाचा मार्ग असावा, दादागिरीचा मंच नव्हे — आणि म्हणूनच अरुण जोशीचा तुरुंगवास हा फक्त एका व्यक्तीचा पराभव नाही, तर राजकीय गर्व आणि सत्तेच्या गैरवापरावर झालेला लोकशाहीचा झटका आहे.

न्यायालयीन कोठडीमागचं राजकारण?

पोलिसांनी या आरोपीची पोलीस कोठडी घेण्याची मागणी अपेक्षित असताना, न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे काहीसा ‘मखलाशीचा’ संशय व्यक्त केला जातोय.
राजकीय दडपण, समाजातील अफवा आणि वातावरणातील तणाव यामध्येही पोलिसांनी कायद्याच्या मार्गानेच तपास व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

kamlakar

कायदा सर्वांसाठी समान

कायदा कोणासाठीही वेगळा नसतो.
कोपरगावमध्ये आज घडलेली घटना या तत्त्वाचीच आठवण करून देते —
“कायदा सर्वांसाठी समान आहे” ही भावना पुन्हा एकदा जनतेच्या मनात दृढ झाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button