Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

राहाता पोलिसांना अंतिम इशाराफरार आरोपींना अटक नाही तर डीवायएसपी कार्यालयासमोर आंदोलन

शिर्डी | प्रतिनिधी
राहाता तालुक्यातील शिंगवे येथे मागील आठवड्यात घडलेल्या गंभीर ॲट्रोसिटी (अत्याचार) प्रकरणात अखेर पोलिसांना एका आरोपीस अटक करण्यात यश आले असले, तरी तीन आरोपी अद्याप फरार असल्याने राहाता पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. ११ रोजी शिंगवे येथील मातंग वस्तीमध्ये सवर्ण समाजातील गोवर्धन रामराव बर्गे, कार्तिक गोवर्धन बर्गे, अश्विन गोवर्धन बर्गे व सागर शिवाजी काळे यांनी जातीवाचक शिवीगाळ करत दहशत माजवली. अण्णा भाऊ साठे चौकात येऊन मातंग समाजातील तरुणांना बेदम मारहाण करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.
या प्रकरणी नंदू पगारे यांनी राहाता पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.


🚨 गंभीर आरोप : आरोपींना पोलिसांचे अभय?
पीडित नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
गुन्हा दाखल झाल्याच दिवशी आरोपी राहाता पोलीस ठाण्यात हजर होते, मात्र पोलिसांनी त्यांना ठाण्यात बसवून ठेवून, गुन्हा नोंदणी सुरू असतानाच अर्थपूर्ण संबंध जोपासून त्यांना सोडून दिल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
“ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सोडून दिले, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर डीवायएसपी कार्यालयासमोर तमाम समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल,”
असा कडक इशारा पीडित नातेवाईकांनी दिला आहे.

👮 एकास अटक, तिघे फरार
या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे असून, विशेष पथकाने शिंगवे शिवारातून कार्तिक गोवर्धन बर्गे याला गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली आहे.
उर्वरित तीन आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
“लवकरच फरार आरोपींनाही अटक करून गजाआड केले जाईल,” असा पुनरुच्चार डीवायएसपी अमोल भारती यांनी केला आहे.


⚠️ राहाता पोलीस पुन्हा वादात
ॲट्रोसिटीसारख्या संवेदनशील प्रकरणात आरोपींना सुरुवातीला मोकळे सोडल्याचा आरोप झाल्याने राहाता पोलीस पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button