Letest News
रस्त्यावर गुटखा थुंकणाऱ्या तरुणावर कारवाई सर्जेराव कोते पाटील यांच्या जागरूकतेमुळे नगरपालिकेची तातडी... साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख...
Blog

उद्धव ठाकरेंनी घेतले साईबाबांचे मनोभावे दर्शन दर्शना नंतर राहाता येथे सभेसाठी रवाना

उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. आज नगर जिल्ह्यातील सोनई,श्रीरामपूर, राहुरी सह राहाता या ठिकाणी आले होते. या सर्व ठिकाणी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी त्यांची मोठी सभा झाली. त्यांचे भव्य स्वागत यावेळी करण्यात आले. सोनई येथे तब्बल २० जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान या सभेमध्ये त्यांनी विरोधकांवर समाचार घेतला तसेच त्यांनी यावेळी आ.शंकराव गडाख यांचे तोंडभरून उद्धव ठाकरेंनी केले.

sai nirman
जाहिरात

मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सोन्यासारखे माझे मर्द मावळे आहेत, त्यांचे, त्यांच्या प्रामाणिकपणाचे मी काय वर्णन करू, ज्यांच्याकडे पक्ष नाही, चिन्ह देखील नाही तरीही तुम्ही आमच्यावर प्रेम करत आहात, हे पाहून मी नतमस्तक होतो.. आता सध्याला माझ्याकडे तुम्हाला द्यायला विश्वास आहे. गडाखांसारखे निष्ठावंत दुसरे नाहीत असे ते यावेळी म्हणाले.

मोदी आणि फडणवीस यांच्या क्लिप आहेत. आदर्शमधील डीलर असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू, अशी भाजपची परिस्थिती आहे, जे घाबरतात ते भाकड पक्षात जातात, अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
आज उद्धव ठाकरे यांची राहाता येथे सभा आहे त्यापूर्वी शिर्डीत येऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले त्यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button