Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
राजकीयशिर्डी

ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी

शिर्डी | वार्ताहर
विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) व शालेय शिक्षण विभाग, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी (निगमगाव-कोहळे) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे.
ऊर्जा ही भविष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती असून तिचा योग्य वापर आणि संवर्धनाची जाणीव लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या सामाजिक उद्देशाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला आणि घोषवाक्य लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल २८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कल्पकता, लेखनकौशल्य आणि सामाजिक जाणीव प्रभावीपणे मांडली.
स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे शालेय स्तरावरील निकाल जाहीर करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव उंचावले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
🔹 अर्णव लहाणू सोनवणे (इयत्ता ६ वी ‘ब’) – प्रथम
🔹 विशाल गणेश म्हस्के (इयत्ता ७ वी ‘ब’) – द्वितीय
🔹 जानवी अशोक गायके (इयत्ता ७ वी ‘अ’) – तृतीय
चित्रकला स्पर्धेतील विजेते
🔹 ओमप्रिया नारायण सय्यद (इयत्ता ६ वी ‘अ’) – प्रथम
🔹 सोना नासीरखान शेख (इयत्ता ७ वी ‘अ’) – द्वितीय
🔹 साक्षी संदीप पवार (इयत्ता ५ वी ‘ब’) – तृतीय
घोषवाक्य स्पर्धेतील गुणवंत
🔹 वेदांत महेश गायकवाड (इयत्ता ६ वी ‘अ’) – प्रथम
🔹 आयुष राहुल गावकर (इयत्ता ६ वी ‘अ’) – द्वितीय
🔹 आपूर्वा अनिल शिंदे (इयत्ता ७ वी ‘ब’) – तृतीय


या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीचे महत्त्व, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी प्रभावी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला योग्य दिशा देत त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाळेने केले असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी कला शिक्षक हेमंत गीते यांनी विशेष मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी, प्रभारी प्राचार्या स्वप्ना जगताप, शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. तसेच श्रीमती सोनिया ठोकळे, श्री विकास निर्मळ, श्रीमती वैजयंती गाजरे, श्री शेखर पवार आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.


विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीनराज वांडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच उल्लेखनीय यशाची अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय कर्तव्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल सातत्याने करत असून, या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button