Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

नगराध्यक्ष जयश्री ताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाघवस्ती येथे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम

शिर्डी नगराध्यक्ष मा. जयश्री ताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील वाघवस्ती परिसरात मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वाघवस्ती तसेच परिसरातील महिला मोठ्या उत्साहाने आणि लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या प्रसंगी महिलांना हळदीकुंकू तसेच वाण म्हणून विविध उपयुक्त साहित्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले. उपस्थित महिलांचे ओक्षण करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष मा. जयश्री ताई थोरात यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आयोजक महिलांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

यावेळी विविध शासकीय योजनांची माहिती देत महिलांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन अभिषेक तुकाराम थोरात, नीलम थोरात, विमल थोरात, पूजा धीवर, रंजना सावंत, चंद्रकला चव्हाण, मुक्ता सिरसागार, विमल चव्हाण, शीला त्रिभुवन, रोहिणी काटेपुरी आदी महिलांनी केले होते. कार्यक्रमाला सर्वाधिक महिलांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांचे आभार मानण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button