Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
राजकीयशिर्डी

साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी

शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे साईसेवा ही केवळ कर्तव्य नसून ती एक श्रद्धा आणि जबाबदारी आहे, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. संस्थानच्या संरक्षण विभागातील पहारेकरी श्री. अशोक नळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे साईभक्तांचा संस्थानवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


काल मंदिर परिसरातील देणगी काउंटरजवळ नियमित गस्त घालत असताना श्री. नळे यांच्या नजरेस एक संशयास्पद पिशवी पडली. त्यांनी तत्काळ ती सुरक्षित ताब्यात घेत तपासणी केली असता त्यामध्ये चार पासपोर्ट आणि सिंगापूर येथील 110 डॉलर इतके विदेशी चलन आढळून आले. ही बाब अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील असल्याने त्यांनी कोणतीही ढिलाई न करता सर्व साहित्य त्वरित संरक्षण कार्यालयात जमा केले.
यानंतर संस्थान प्रशासनाने संपूर्ण घटनेची सखोल पडताळणी सुरू केली. पासपोर्टवरील माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात आला असता, हे सर्व कागदपत्रे व चलन श्री. वेडापल्ली, रा. सिंगापूर या साईभक्तांचे असल्याचे स्पष्ट झाले. संस्थानकडून त्यांच्याशी तातडीने संपर्क साधण्यात आला आणि त्यांना शिर्डीत बोलावून सर्व कागदपत्रे व रक्कम सुरक्षितरित्या परत करण्यात आली.


आपले हरवलेले महत्त्वाचे कागदपत्रे व पैसे सुखरूप परत मिळाल्याने संबंधित साईभक्तांनी मोठा दिलासा व्यक्त केला. त्यांनी संस्थान प्रशासन तसेच विशेषतः श्री. अशोक नळे यांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले. या प्रामाणिक व निःस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे रुपये 1,00,000/- इतकी देणगी अर्पण केली.
ही घटना केवळ एक प्रामाणिक कृती नसून साईसेवेतील मूल्यांची जपणूक करणारी प्रेरणादायी कहाणी आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळेच संस्थानची प्रतिमा उंचावते आणि देश-विदेशातील साईभक्तांचा विश्वास अधिक दृढ होतो.


श्री. अशोक नळे यांच्या या कर्तव्यपरायणतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीने ‘प्रामाणिकपणा हीच खरी सेवा’ हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रियेची काटेकोर पडताळणी करण्यात आली. पासपोर्टवरील माहितीनुसार संबंधित साईभक्त श्री. वेडापल्ली, रा. सिंगापूर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व कागदपत्रे व विदेशी चलन सुरक्षितपणे परत करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button