Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पवित्र नगरीत भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दर्शन करून निवासाकडे परतणाऱ्या साईभक्त महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व हार मोटारसायकलवरील अज्ञात चोरट्यांनी निर्भयपणे हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील चाथेर येथील रहिवासी सितारत्नम सुब्रमन्यु गन्नमणी (वय ५२) या पती व नातेवाईकांसह १४ जानेवारी रोजी साईबाबा दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. दर्शन व प्रसादालयात जेवण आटोपून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या द्वारावती भक्त निवासकडे पायी जात असताना हॉटेल प्राईड इन परिसरात ही घटना घडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मोटारसायकलवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या गळ्यातील दोन पळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व काळ्या मण्यात गुंफलेला लक्ष्मी पेंडल असलेला सोन्याचा हार ओढून घेतला. प्रकार इतका अचानक घडला की काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी राँग साईडने मोटारसायकल घेवून पलायन केले.
या झडपमारीत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०९(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, भाविकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button